Raja Shivaji Box Office Collection Day 7: दिग्दर्शक, अभिनय आणि लेखन अशा जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची शौर्यगाथा सांगणारा 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. दमदार कथानकाच्या जोरावर या ऐतिहासिक सिनेमानं थिएटर्समध्ये प्रेक्षकांची मनं जिंकलीत. विकेंडला रेकॉर्ड रचणारा 'राजा शिवाजी' विकडेजमध्येही बॉक्स ऑफिस हादरवून सोडतोय. 'राजा शिवाजी' आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा मराठी सिनेमा ठरला आहे. अशातच विकडेजमध्ये 'राजा शिवाजी'च्या कमाईत काहीशी घट झाली होती. तर, रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच, गुरुवारी पुन्हा एकदा 'राजा शिवाजी'नं दमदार कमाई केली आहे.  

'राजा शिवाजी'ची कमाई किती? (Raja Shivaji Box Office Collection)

छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा असलेला रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. या सिनेमानं स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे. आठवड्याच्या शेवटी धमाकेदार कमाई करणारा हा सिनेमा आठवड्याच्या दिवसांतही दमदार कमाई करतोय. सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहिल्यानंतर हे अधिक स्पष्ट होतंय. 

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सातव्या दिवशी या सिनेमानं 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. वर्किंग डेच्या तुलनेत हा आकडा अत्यंत उल्लेखनीय मानला जात आहे. या कमाईमुळे भारतातील 'राजा शिवाजी' सिनेमाचं नेट कलेक्शन आता 56 कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे. रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवरचा वेग पाहता, सिनेमाचं लाईफटाईम कलेक्शन 100 कोटींच्या जवळ पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, त्यासाठी येत्या विकेंडमध्ये सिनेमाला जोरदार कमाई करावी लागणार आहे.

ज्या वेगानं रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर कमाई करतोय, ते पाहता एवढ्यात तरी तो आपला बॉक्स ऑफिसवरचा ताबा सोडणार नाही, यात काही शंका नाही. मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी'ची आतापर्यंतची कमाई पाहता, या सिनेमाचं लाईफटाईम कलेक्शन 100 कोटींवर पोहोचू शकतं, यात काही शंका नाही. 

'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूडकरांची मांदियाळी (Bollywood Stars In Raja Shivaji Movie)

'राजा शिवाजी' ही फिल्म पीरियड ड्रामा असल्यामुळे सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार या सिनेमाचा भाग आहेत. यामध्ये रितेश देशमुख, सलमान खान, संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, भाग्यश्री, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जेनेलिया देशमुख, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सलमान खान यानं या सिनेमात कॅमिओ केला असून जीवा महालची भूमिका साकारली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ मोडणार ‘या’ सर्वाधिक कमाई करणाऱ्या 10 चित्रपटांचा रेकॉर्ड, पाहा किती नंबरवर?