Maharashtra Board SSC Exam Result 2026 पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल  (SSC Result) अखेर आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (SSC Exam Result 2026) फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल आज(शुक्रवार, 8 मे) दुपारी 01.00 वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे. यापत्रकारपरिषदेतून दहावीचा विभागवार निकालासंदर्भातमाहिती आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. (Maharashtra SSC Result 2026)

राज्यभरातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या सर्व विभागांचा निकाल एकाच वेळी अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. महाराष्ट्र बोर्डाने पुष्टी केली आहे की विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या पोर्टल्सवर निकाल पाहू शकतील. दोन्ही पोर्टल्सवर दुपारी १ वाजता एसएससी निकालाची लिंक सक्रिय होणारअसल्याचीमाहितीआहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र एसएससी उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04 टक्के होती, तर 2024 मध्ये 95.81 टक्के आणि 2023 मध्ये 93.83 टक्के नोंदवली गेली आहे. त्यामुळेयंदाच्यानिकाकडेसर्वांचेलक्षलागूनराहिलेआहे.

दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार?

1. https://sscresult.mahahsscboard.in/2. https://results.digilocker.gov.in     3. https://mahahsscboard.in 4. https://sscresult.mkcl.org 5. https://results.targetpublications.org 6. https://results.navneet.com 

दहावीचा निकाल कसा पाहणार?

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यांना उद्या दुपारी एक वाजता निकाल उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि आईचं नाव नोंदवून निकाल पाहता येईल.  

स्टेप 1: mahahsscboard.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्यास्टेप 2: Maharashtra SSC Result 2026 ही लिंक उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा स्टेप 3: विद्यार्थ्यांनी यानंतर रोल नंबर आणि आईचं नाव नोंदवून लॉगीन करावं. स्टेप 4: विद्यार्थ्यांनी सबमिट बटनावर क्लिक केल्यावर त्यांच्या स्क्रीनवर दहावीचा निकाल उपब्ध होईल स्टेप 5:  दहावीचा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून पुढील कामांसाठी सोबत ठेवा.  

दरम्यान,दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं तात्पुरत्या स्वरुपात गुणपत्रक मिळेल. मूळ गुणपत्रक संबंधित विद्यार्थ्याच्या शाळांमध्ये मिळेल. त्यासाठीची तारीख बोर्डाकडून जाहीर केली जाईल.  

Maharashtra Class 10 Result: विषयनिहाय गुणांची पडताळणी 9 मे पासून करता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार 8 मे 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत प्रकटन प्रसिद्ध केले असून, पुणे, मुंबई, नागपूरसह नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणांची पडताळणी 9 मे पासून करता येईल. राज्यभरातील तब्बल 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार असून, निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण आहे. मुंबई विभागातील सुमारे 3 लाख 48 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे.
 
इतर महत्वाच्या बातम्या
 

Education Loan Information:

Calculate Education Loan EMI