Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ मोडणार ‘या’ सर्वाधिक कमाई करणाऱ्या 10 चित्रपटांचा रेकॉर्ड, पाहा किती नंबरवर?
Raja Shivaji: रितेश देशमुखचा सिनेमाराजा शिवाजी भारतीय बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडणं सुरूच ठेवून आहे. केवळ शनिवार-रविवारच नव्हे, तर आठवड्याच्या इतर दिवशीही हा सिनेमा दमदार कामगिरी करतोय.
Continues below advertisement

Riteish Deshmukh Raja Shivaji: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित राजा शिवाजी चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
Continues below advertisement
1/8
advance बुकिंग मध्येच दमदार कमाई केल्यानंतर हा सिनेमा 50 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.सहाव्या दिवशी या चित्रपटाने 4.25 कोटी रुपयांची कमाई केली.
2/8
मराठीत सर्वाधिक बजेट असणाऱ्या चित्रपटांपैकी एक असणाऱ्या या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर गेलाय.
3/8
आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर सैराट हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. 90 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले होते.
4/8
दुसऱ्या क्रमांकावर 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाचा नंबर लागतो.
5/8
तिसऱ्या क्रमांकावर रितेश देशमुखचाच वेड हा चित्रपट आहे. 'वेड'ची एकूण (लाईफटाईम) कमाई 61.2 कोटी इतकी आहे.
Continues below advertisement
6/8
राजा शिवाजी चौथ्या क्रमांकावर पोहोचलाय. अवघ्या सहा दिवसात या चित्रपटाने 47.6 कोटी रुपये कमावलेत.
7/8
नाना पाटेकरांचा नटसम्राट (42 कोटी), पावनखिंड (37.72 कोटी) आणि रितेशचा लई भारी(37 कोटी) चित्रपट पाचव्या सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.
8/8
त्यानंतर कट्यार काळजात घुसली (35 कोटी), ठाकरे (31.6) आणि टाईमपास 30 कोटी रुपयांची कमी करत दहाव्या क्रमांकावर आहे.
Published at : 07 May 2026 06:34 PM (IST)