Akot Assembly Constituency 2024: अकोला जिल्ह्यातील एकुण पाच विधान सभा मतदारसंघापैकी ४ जागा भाजपा ला तर १ जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली. अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे (Prakash Bharasakle) यांना संधी देण्यात आली आहे. प्रकाश भारसाकळे यांचे नाव जाहीर झाल्यामुळे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचा अकोटवरील दावा संपुष्टात आला आहे. महायुतीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाकडे अकोट मधून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ सोडण्यास भाजपने नकार दिला. त्यामुळं आमदार अमोल मिटकरी यांचं विधानसभा लढण्याचा स्वप्नं भंगल्याच्या चर्चा होत्या, मात्र आज अमोल मिटकरी यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
एकही जागा पक्षाला न मिळणे हे वेदनादायी
अमोल मिटकरी यांनी याबाबत सोशल मिडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडिया पोस्टमध्ये मिटकरींनी म्हटलं आहे, "अकोला जिल्ह्यातील एकुण पाच विधान सभा मतदारसंघापैकी ४ जागा भाजपा ला तर १ जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली. मी स्वत: जिल्ह्यात चार वर्ष प्रामाणिकपणे काम केले. पक्ष वाढीसाठी तीन जागेची मागणी केली मात्र एकही जागा पक्षाला न मिळणे हे वेदनादायी आहे", असं मिटकरींनी म्हटलं आहे.
पश्चिम विदर्भात अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्याबाबत प्रतिक्रिया
पश्चिम विदर्भात अकोला, वाशिम , बुलडाणा जिल्ह्यात एकाही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार नसणे हे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी वेळी निश्चित आमच्याकरिता चिंताजनक बाब राहील. तिन्ही जिल्ह्यात घड्याळ चिन्हच नाही याचा खेद वाटतो, अशी पोस्ट देखील अमोल मिटकरींनी यावेळी केली आहे.
माझं अकोट यांचे विधानसभा लढण्याच स्वप्नं भंगलंं
महायुतीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाकडे अकोट मधून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ सोडण्यास भाजपने नकार दिला. यामुळे अकोटमधून लढण्याचं मिटकरींचं स्वप्न भंगलं आहे, याबाबत पोस्ट करत मिटकरी म्हणाले, "माझं अकोट यांचे विधानसभा लढण्याच स्वप्नं भंगलंं. मी या भागात चार वर्ष अखंड मेहनत घेतली. पण पक्षाचा निर्णय अंतिम असतो. अकोटमध्ये तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या प्रकाश पाटील भारसाकळे यांचेअभिनंदन. अजितदादा आणि पक्षासाठी अकोटवरचा दावा सोडला. शेवटी महायुती विजयी होणं हेच लक्ष असेल'',असंही त्यांनी म्हटलं आहे.