Raj Kundra Return to Instagram : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj kundra) हे गेली काही दिवस चर्चेत आहेत. पॉर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणामुळे राजला सोशल मीडियावर बऱ्याच नेटकऱ्यांनी ट्रोल केले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राजनं त्याच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटो डिलीट केले होते. त्यानंतर तो बरेच दिवस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हता. आता त्याने त्याचे इंस्टाग्राम(Instagram) अकाऊंट पुन्हा अॅक्टिव्ह केले आहे.
राजचे इंस्टाग्राम अकाऊंट हे प्रायव्हेट आहे. तसेच त्याने या अकाऊंटवरील सर्व पोस्ट डिलीट देखील केल्या होत्या. राजचे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिले आहे की, स्वत:च्या आयुष्यावर प्रेम करा. राज त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शिल्पाला नाही तर त्याच्या मुंबईमधील Bastian Mumbai या हॉटेलच्या पेजला फॉलो करतो. राजच्या इंस्टाग्राम अकाऊंटला 977k नेटकरी फॉलो करतात.
पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. त्यानंतर राज कुंद्राने त्याचे अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
Poonam Pandey : कास्टिंग काऊचबद्दल पूनम पांडे म्हणाली, 'तो अनुभव खूप वाईट…'