Poonam Pandey : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडे (poonam pandey) ही नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वी पूनमचा घटस्फोट झाला. तिनं पती सॅमसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मुलाखतींमध्ये माहिती देत असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पूनमने कास्टिंग काऊचबद्दल तिचे मत व्यक्त केले.  मुलाखतीमध्ये पुनमने सांगितले, 'माझ्यासोबत आत्तापर्यंत कास्टिंग काऊच हा प्रकार घडला नाही. पण मला माहित आहे कास्टिंग काऊचचा अनुभव हा खूप वाईट असतो. बॉलिवूडमध्ये माझा कोणीच गॉड फादर नव्हता. या इंडस्ट्रीमध्ये माझे मित्र देखील नाहित. त्यामुळे माझ्या आयुष्यात कास्टिंग काऊचचा अनुभव कधीच आला नाही.  

Continues below advertisement

 नशा,मालिनी अँड कंपनी,द वीकेंड, आ गया हीरो आणि द जर्नी ऑफ़ कर्मा या चित्रपटांमध्ये पूनमनं काम केले आहे. अक्षिनयापेक्षी पूनम तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तसेच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. 

Continues below advertisement

महत्त्वाच्या बातम्या :