मुंबई : पॉर्न रॅकेटमध्ये अडकलेला उद्योगपती राज कुंद्रा (Raj kundra Case)याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. कंपनीचे चार कर्मचारी हे साक्षीदार बनले आहेत. त्यामुळे आता राज कुंद्रा विरोधात मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलकडे महत्त्वाचा दुआ हाती लागला आहे. इतकंच नाही तर राज कुंद्रानं दीड वर्षात पॉर्न फिल्म म्हणून सुमारे 20 कोटी रुपये कमवले याचा सुद्धा तपासात उघड झालं आहे.
राज कुंद्राच्या अंधेरी येथील ऑफिसची प्रॉपर्टी सेलकडून झडती घेण्यात आली. ज्यात त्यांना एक गुप्त कपाट सुद्धा सापडलं आहे. त्यामध्ये काही बॉक्स फाईली होत्या. ज्यात क्रिप्टो करन्सी संदर्भातील माहिती होती. म्हणजेच राज कुंद्रा क्रिप्टो करेंसी म्हणजेच डिजिटल पैशांमध्ये सुद्धा व्यवहार करत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पॉर्न फिल्म बनवून कमावलेले पैसे हे केंरीन कंपनीला पाठवले जायचे मात्र केंरीन कंपनीतून ते पैसे एका विशिष्ट माध्यमातून पुन्हा राज कुंद्राला भेटायचे. हे पैसे कुठच्या मार्गाने येत होते याचा तपास प्रॉपर्टी सेलकडून केला जातोय.
मात्र राज कुंद्रानं प्रॉपर्टी सेलला दिलेल्या आपल्या जबाबात सांगितलं की त्याचा आणि हॉटशॉटचा काही संबंध नाही. त्यांनी ते बनवलं आणि ते विकलं त्याचा फक्त मेंटेनन्स तो करायचा. मात्र त्याचं हाच जबाब पोलिसांना संशय घेण्यास प्रवृत्त करत आहे. कारण फक्त चार महिन्यांसाठी हे मेंटेनन्स करण्यात आलं होतं. इतक्या कमी कालावधीसाठी कुणीही मेंटेनन्स हाती घेत नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्रा चौकशीमध्ये हवं तसं सहकार्य करत नाही.
Pornography Case: चौकशीदरम्यान अनेकदा शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं; सलग अडीच तास प्रश्नोत्तरे
प्रॉपर्टी सेलने 3 स्टोरेज अटॅच नेटवर्क (SAN) जप्त केले आहेत. ज्याचा वापर अधिक प्रमाणात असलेल्या डेटाचा वापर करण्यासाठी केला जातो. SAN चे तीन बॉक्स प्रॉपर्टी सेलने जप्त केली आहेत. त्यामधील दोन सॅनचे बॉक्स हे रिकामी आहेत. एका सेंडमध्ये 24 हार्ड डिस्क असतात. त्या पहिल्या बॉक्समध्ये प्रॉपर्टी सेलला 51 व्हिडीओ क्लिप्स सापडल्या आहेत.
वियान कंपनीचा वापर हा पॉर्न फिल्म रॅकेट चालवण्यासाठी केला जात होता. 2017 मध्ये शिल्पा शेट्टीने वियान मधून आपल्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला होता. तर 2020 मध्ये शिल्पा शेट्टीच्या सासूने आपल्या पदावरून राजीनामा दिला होता.