Raid 2 Box Office Collection Day 10: अजय देवगणच्या 'रेड 2' (Raid 2) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटानं 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे आणि अजूनही तो बॉक्स ऑफिसवर छप्पडफाड कमाई करतोय. चित्रपटानं दहाव्या दिवशी जोरदार कलेक्शन केलं.
दुसऱ्या शनिवारी 'रेड 2' ची कमाई
सॅक्निल्कच्या अहवालानुसार, चित्रपटानं दुसऱ्या शनिवारी 8 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. दरम्यान, दुसऱ्या शनिवारी झालेल्या कमाईचे हे आकडे अद्याप अधिकृत नाहीत. पण जर चित्रपटानं दहाव्या दिवशी 8 कोटींची कमाई केली असेल, तर आतापर्यंत चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 108.75 कोटी झालं आहे.
'रेड 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'रेड 2' ची ओपनिंग 19.25 कोटी होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 12 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई वाढली आणि चित्रपटाने 18 कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 22 कोटी रुपये कमावले. पाचव्या दिवशी चित्रपटाच्या व्यवसायात मोठी घसरण झाली. या चित्रपटाने फक्त 7.5 कोटी रुपये कमावले. सहाव्या दिवशी चित्रपटाने 7 कोटी रुपये कमावले. आठव्या दिवशी या चित्रपटाने 5.25 कोटी रुपये कमावले.
पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं 95.75 कोटी रुपये कमावलेत. त्यानंतर नवव्या दिवशी चित्रपटानं 5 कोटी रुपये कमावलेत.
दरम्यान, अजय देवगण व्यतिरिक्त Raid 2 मध्ये वाणी कपूर, रितेश देशमुख, सौरभ शुक्ला, रजत कपूर, अमित सियाल हे कलाकार आहेत. अभिनेत्री तमन्ना भाटियानं चित्रपटात एक आयटम सॉन्ग केलंय. हे आयटम सॉन्ग चर्चेत राहिलं. हा चित्रपट राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड'चा सिक्वेल आहे. 'रेड 2' देखील राज कुमार गुप्ता यांनी बनवला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :