Pakistan Violates Ceasefire नवी दिल्ली: पाकिस्तानच्या डीजीएमओनं दुपारी 3.35 वाजता भारताच्या डीजीएमओला फोन करण्यात आला.भारताला पाकिस्तानकडून शस्त्रसंधीसाठी विनंती करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सायंकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी सुरु झाल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र, पाकिस्तानच्या सैन्याकडून शस्त्रसंधी करण्यात आली. भारताच्या विदेश सचिवांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत पाकिस्तानला खडसावलं. इकडं पाकिस्तानकडून शस्त्रसंधींच उल्लंघन करण्यात येत होतं. त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले जात होते.
भारतासोबत शस्त्रसंधी करुन अवघ्या तीन तासात पाकिस्ताननं आपला खरा रंग दाखवून दिला आहे. एकीकडे पाकिस्तानकडून शस्त्रसंधींच उल्लंघन करत ड्रोन हल्ले करण्यात येत होते. त्याचेवळी शहबाझ शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
पाकिस्ताननं 8 वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यानंतर काही वेळात म्हणजेच 8 वाजून 39 मिनिटांनी शहबाझ शरीफ डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानत होते.
शहबाझ शरीफ यांना या क्षेत्रातील शांततेसाठी त्यांच्या नेतृत्त्वाच्या सक्रीय भूमिकेसाठी धन्यवाद देतो. पाकिस्तान या निर्णयासाठी संयुक्त राज्य म्हणजे अमेरिकेचं अभिनंदन करत आहे. आम्हाला या निर्णयाचा स्वीकार क्षेत्रात शांतता आणि स्थिरतेसाठी केला आहे. दक्षिण आशियातील शांततेसाठी त्यांच्या योगदानासाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वॅन्स आणि विदेश मंत्री मार्को रुबियो यांचे आभार मानतो. ज्या प्रश्नांनी या क्षेत्रात वाद निर्माण झाले , संघर्ष झाले ते सोडवण्याच्या दिशेनं एक नवी सुरुवात आहे. या क्षेत्रात त्या प्रश्नानं शांतता, समृद्धी आणि स्थिरतेच्या मार्गात अडसर केल्याचं शहबाझ शरीफ म्हणाले.
शहबाज शरीफचे ट्वीट
भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, परिस्थिती गांभीर्यानं घ्या
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला इशारा देण्यातआला आहे. भारताचे विदेश सचिव विक्रम मिसरी म्हणाले,गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून उल्लंघन केलं जात आहे. भारतीय सैन्याकडून याचं उत्तर दिलं जात आहे. या सीमेवरील अतिक्रमणाचा सामना करत आहे. हे अत्यंत निंदनीय असून पाकिस्तान याला जबाबदार आहे, असंही मिसरी म्हणाले.
पाकिस्ताननं हे गांभीर्यानं घ्यावं आणि अतिक्रमण रोखण्यासाठी तातडीनं योग्य कारवाई करावी. सैन्याचं यावर योग्य लक्ष आहे. कोणत्याही अतिक्रमणाचा सामना करण्यासाठी आणि रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही तासांपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तान केलं जातंय. दोन्ही देशांच्या डीजीएमओकडून करण्यात घेण्यात आलेल्या निर्णयाचं उल्लंघन करण्यात आलं आहे, असही मिसरी म्हणाले.