Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटेच्या (Radhika Apte ) मॅटर्निटी फोटो शूटची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे. राधिकानं नुकतच गोंडस मुलीला जन्म दिला. प्रेग्नेंसीमध्ये आलेल्या अनुभवावर आणि तिच्या बदललेल्या दृष्टीकोनावर राधिकांने भाष्य केलंय. तसंच तिने आपल्या बेबी बंपचे फोटो देखील शेअर केलेत. अनेकांनी या फोटोंवर कमेंट करत तिला ट्रोल केल्याचंही पाहायला मिळालं. पण प्रेग्नंसीमध्ये अवस्था नक्की कशी होती यावर राधिकाने भाष्य केलं आहे.
एका कार्यक्रमादरम्यान राधिकाने हजेरी लावली होती. त्यावेळी राधिका प्रेग्नंट असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी तिने तिच्या लेकीसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोवरही राधिकाने हटके असं कॅप्शन दिलं होतं. पण सगळ्यात जास्त चर्चेत आलं ते राधिकाने नुकतच शेअर केलेलं तिचं मॅटर्निटी फोटोशूट. सध्या तिच्या याच फोटोंची चर्चा आहे.
राधिकाने काय म्हटलं?
मुलीला जन्म देण्याच्या एक आठवड्याआधी राधिकाने वोग मॅग्जीनसोबत फोटोशूट केलंय. तसंच वोगसोबत केलेल्या संवादात राधिकाने तिच्या प्रेग्नेंसीमध्ये आलेल्या अनुभवावर भाष्य केलंय. 'प्रेग्नेंसी हा अपघात नव्हता,मात्र तरीही मला धक्का बसला. एवढ्या वाढलेल्या वजनामध्ये स्वत:ला कधी पाहिलं नव्हतं. माझं अंग सुजलं होत. माझ्या पेलविसमध्ये वेदना होत होत्या. तसंच झोपेच्या अभावाने माझा दृष्टीकोन बदलला होता. मात्र बाळाला जन्म दिल्याच्या अवघ्या दोन आठवड्यात माझं शरीर वेगळं दिसू लागलंय. बदललेल्या शरीरात मला वेगळं सोंदर्य जाणवतंय. बळाला जन्म देणं हे नक्कीच चमत्कारी आहे मात्र प्रेग्नेंसीमध्ये होणाऱ्या वेदना आणि त्रासाबाबत कोणी भाष्य करत नाही.. आणि लोकांचं असं वागणं मला मूर्खपणा वाटतं.
राधिकाची सिनेकारकीर्द जाणून घ्या... (Radhika Apte Movies)
राधिकाने तामिळ, मराठी, तेलुगू आणि इंग्रजी या भाषांतील सिनेमांत काम केलं आहे. वाह लाईफ हो तो ऐसी, अंतहीन, वेटिंग रुम, रक्तचरित्र, शोर इन द सिटी, कबाली, पॅडमॅन, अंधाधून अशा अनेक सिनेमांत राधिकाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. राधिकाचा 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता.
ही बातमी वाचा :
खुशखबर! राधिका आपटेच्या घरी पाळणा हलला, दिला गोड मुलीला जन्म; गोंडस बाळाचा फोटो पाहिलात का?