मुंबई : बॉलिवुड जगतातील अभिनेते-अभिनेत्री नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. यातही अभिनेत्रींच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची तर अनेकांना उत्सुकता असते. त्यामुळेच अभिनेत्रींची प्रेमप्रकरणं, लग्नसोहळे, प्रसुतीची सगळीकडे चर्चा रगंलेली असते. असे असतानाच आता राधिका आपटे ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी ती गरोदर असल्याचे समजले होते. आता राधिकाने एका छान आणि गोंडस बाळाला जन्म दिला आहे. खुद्द राधिकानेच ही माहिती दिली असून सोशल मीडियावर बाळाचा फोटोदेखील पोस्ट केला आहे.
राधिका आपटेनेच दिली गोड बातमी
राधिका आपटे ही बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक कठीण भूमिका लिलया पेललेल्या आहेत. गरोदर असल्यामुळे तिने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती कुठेही दिसली नव्हती. मात्र आता राधिका आपटे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आठवड्याभरापूर्वी एका छान आणि गोड बाळाला जन्म दिला आहे. या बाळाचा फोटो खुद्द राधिका आपटेनेच इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये राधिका आणि तिचं बाळ दिसत आहे.
राधिका आपटेने फोटोसोबत नेमकं काय म्हटलंय?
राधिका आपटेने एक छान फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका लॅपटॉपसमोर बसली आहे. तिने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तिच्या मांडीवर तिचं बाळ दिसतंय. या फोटोसोबत तिने छान कॅप्शन दिलंय. आमच्या बाळाचा जन्म होऊन आठवडा झालाय. एका आठवड्याच्या बाळासाहोबत ही माझी कामासाठीची पहिलीच मिटिंग आहे, असं राधिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. राधिकाने या कॅप्शनसोबत #itsagirl असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे राधिकाला मुलगी झाली आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राधिका आपटेने आपल्या प्रेग्नेन्सीची वेगळी घोषणा केली नव्हती. एका कार्यक्रमात ती बेबी बम्पसह दिसल्यानंतर ती गरोदर असल्याचे तिच्या चाहत्यांना समजले होते. राधिका आपटेने 12 वर्षांपूर्वी ब्रिटेनचा व्हायोलनिस्ट आणि कम्पोजर बेनेडिक्ट डेयरल याच्याशी लग्न केलं होतं.
हेही वाचा :
तुरुंगाबाहेर येताच पुष्पाने मागितली माफी, रात्रभर जेलमध्ये राहिल्यानंतर सुटका, हात जोडून म्हणाला....