Pushpa 2 Star Allu Arjun Arrest : जगभरात आपल्या स्टारडमनं आग लावणाऱ्या अल्लू अर्जुनला (Allu Arjun) 'पुष्पा 2: द रूल'चा प्रिमीयर शो चांगलाच भोवला आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रिमीयर शोवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा लहान मुलाला गंभीर दुखापत झाली होती. याच प्रकरणी चौकशीसाठी अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अल्लू अर्जुनला अटक करण्यासाठी पोलीस पोहोचले, त्यावेळचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
अल्लू अर्जुनला अटक करण्यासाठी ज्यावेळी पोलीस त्याच्या घरी पोहोचले त्यावेळी तो घराखाली अनवाणी पायांनी फिरत होता. त्यानंतर तो तसाच पोलिसांसोबत घरी गेला. त्यानं आपले कपडे बदलले, कॉफिचा कप घेऊन घराखाली आला. अल्लू अर्जुननं कॉफी घेतली. त्यावेळी त्याची बायको त्याच्यासोबत होती. आजूबाजूला पोलीसही उपस्थित होते. अल्लू अर्जुननं शांतपणे कॉफी संपवली, बायकोच्या कपाळावर किस केलं आणि पोलिसांसोबत निघाला.
अटकेवेळी अल्लू अर्जुननं घातलेल्या कपड्यांनी लक्ष वेधलं
अल्लू अर्जुन पोलिसांसोबत घरातून जातानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. अल्लू अर्जुनला पोलीस अटक करण्यासाठी गेले, त्यावेळी तो घराखाली होता. त्याच्या पायात चप्पल नव्हती, तसेच, तो हाफ पॅन्ट आणि टीशर्ट घालून फिरत होता. पोलीस आल्यानंतर तो घरी गेला आणि कपडे बदलेले. त्यानंतर त्यानं बायकोचा निरोप घेऊन पोलिसांसोबत निघाला. पण, यावेळी अल्लू अर्जुननं घातलेल्या कपड्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अल्लू अर्जुननं पुष्पा 2 चं प्रमोशन करणारं व्हाईट कलरचं हुडी आणि व्हाईट पॅन्ट घातली होती.
दरम्यान, झुकेगा नही साला म्हणणाऱ्या पुष्पाला हैदराबाद पोलिसंनी झुकवलंय. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केलीय. अभिनेता अल्लू अर्जूनचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली. या वेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणात अल्लू अर्जूनवर मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 आणि 118 अंतर्गत चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता.अधिकची लोकप्रियता अंगाशी आली आणि डॅशिग सुपरस्टार अल्लू अर्जूला अटक झालीय.
पाहा व्हिडीओ : Allu Arjun Arrested Full Video : Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाई
महत्त्वाच्या इतर बातम्या :