Pushpa 2 Star Allu Arjun Arrest : हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणी 'पुष्पा 2' अभिनेता अल्लू अर्जुनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रिमीयर शोवेळी थिएटरमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.
हैदराबादच्या आरटीसी एक्स रोडवर असलेल्या 'संध्या' सिनेमा हॉलबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिची दोन मुले जखमी झाली. यानंतर हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हैदराबादमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 39 वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू आणि तिच्या मुलाच्या गंभीर दुखापतीनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.
अल्लू अर्जुनला अटक का? काय घडलेलं त्या दिवशी?
हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी, अल्लू अर्जुन संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता, जिथे अभिनेत्याला पाहून चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. त्यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. याच गर्दीत मोठी चेंगराचेंगरी झाली, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या लहान मुलाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, मृत महिलाही तिचा पती आणि मुलासोबत चित्रपट पाहण्यासाठी आली होती. तसेच, अल्लू अर्जुननं याप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी : अल्लु अर्जुनला अटक, हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई