Pushpa 2 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 'पुष्पा 2' 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा पहिल्या पुष्पापेक्षा मोठा असणार आहे. रश्मिमा मंदानाने नुकतेच पुष्पा 2 (Pushpa 2) बाबत भाष्य केले आहे. 'पुष्पा द राइज' प्रमाणेच 'पुष्पा 2' ला यश मिळावे, यासाठी टीममधील प्रत्येकजण मोठी मेहनत घेत आहे, असे रश्मिका मंदाना म्हणाली होती. दरम्यान आता रश्मिकाने 'पुष्पा 2' बाबत मोठे खुलासे केले आहेत. 


सिनेमा चांगला बनावा, यासाठी संपूर्ण टीमचे परिश्रम 


रश्मिका मंदाना म्हणाली, "पुष्पा 2 हा सिनेमा फार मोठा असणार आहे. आम्ही पहिल्या पार्टमध्ये काही वेडेपणा दाखवला होता. मात्र, पार्ट 2 साठी आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आम्ही शांतपणे सिनेमाबाबत विचार केला आहे. मी काही दिवसांपूर्वीच पुष्पा 2 च्या गाण्यांचे शूटींग केले आहे. टीममधील प्रत्येकजण चांगला सिनेमा बनावा, यासाठी परिश्रम घेत आहे. आम्ही सगळेजण बाहेर गेलो होतो. आम्ही या प्रक्रियेचा आनंद घेतला. ही एक अशी स्टोरी आहे, ज्याला शेवट नाही. तुम्ही हा सिनेमा कोणत्याही दिशेलाही नेऊ शकता. हे फार मजेशीर आहे."


अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पुष्पाच्या पहिल्या पार्टने बंप्पर कमाई केली होती. अनेक दिवस हा चित्रपट सिनेमागृहात होता. सिनेमा हिट ठरल्यानंतर प्रेक्षक पुष्पाच्या सिक्वेलची मागणी करत होते. त्यामुळे पुष्पाच्या टीमवर दबाव होता का?. याबाबत बोलताना रश्मिका म्हणाली, "आमच्यावर कोणताही दबाव नाही. उलट मी चित्रपट पाहते तेव्हा वाटते की, कंबर कसून काम केलं पाहिजे. पुष्पा 2 मधील माझ्या भूमिकेबाबत फार विचार करण्यात आला होता आणि ती चांगलीही आहे. मी सिनमासाठी उत्सुक आहे, घाबरलेली नाही."


'पुष्पा 2' मधील रश्मिकाचा लूक पाहण्यासाठी चाहते आतूर 


रश्मिका पुढे बोलताना म्हणाली, एक अभिनेत्री म्हणून मी मागील 2 वर्षात माझ्यामध्ये चांगल्या सुधारणा करु शकले. त्यामुळे मी चांगला अभिनय करण्यासाठी सक्षम झाले आहे. त्यातून मला आत्मविश्वास मिळतोय. सध्या 'पुष्पा 2'ची शूटींग सुरुच आहे. अल्लू अर्जुनने 2023 मध्येच त्याच्या लूकचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनने साडी नेसली होती आणि चेहऱ्यावर निळा आणि लाल रंग होता. दरम्यान, आता चाहते रश्मिकाच्या लूकची वाट पाहात आहेत. 


हेही वाचलंत का?


Main Atal Hoon Review: रवी जाधव यांचे उत्तम दिग्दर्शन, पंकज त्रिपाठी अभिनयाने नटलेला चित्रपट; वाचा 'मैं अटल हूं' चित्रपटाचा रिव्ह्यू