Pushpa 2 Box Office Collection Day 24:  साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) बॉक्स ऑफिसचा बादशहा बनला आहे. त्याच्या पुष्पा 2 (Pushpa 2) या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली असून 24 व्या दिवशीही सिनेमाची कमाई काही केल्या थांबत नसल्याचं पाहायला मिळतंय. या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचाही पुष्पा 2वर काहीही परिणाम झालेला नाही. चित्रपट आपल्या गतीने कमाई करत असल्याचं पाहायला मिळतंय. 


Sacnilk च्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 ने चौथ्या शनिवारी सर्व भाषांमध्ये 12.50 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या 24व्या दिवसाच्या कलेक्शनची ही अधिकृत आकडेवारी नाही. पण जर पुष्पा 2 ने 12.50 कोटी रुपये कमावले तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 1141.35 कोटी रुपये होईल. या चित्रपटाने 23 व्या दिवशी 8.75 कोटींची कमाई केली होती.                                             


पुष्पा 2ची कमाई


पुष्पा 2 ने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाची कमाई 129.5 कोटी रुपये आहे. जर आपण शनिवारच्या कलेक्शनबद्दल बोललो तर पहिल्या शनिवारी 119.25 कोटी रुपये, दुसऱ्या शनिवारी 63.3 कोटी रुपये आणि तिसऱ्या शनिवारी 24.75 कोटी रुपये कमावले.


 सुकुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2021 मध्ये आलेल्या पुष्पा या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. पुष्पा २ मध्ये पहिल्या चित्रपटाची कथा पुढे नेण्यात आली आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात पुष्पा राजच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदान्ना श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. चित्रपटात राजकीय संबंधही दाखवण्यात आले आहेत. चाहत्यांना चित्रपटाची कथा आणि अल्लू अर्जुनचे स्टारडम खूप आवडले. या अभिनेत्याने चित्रपटात सुरुवातीपासूनच उच्चस्तरीय ॲक्शन केली आहे.                                          






ही बातमी वाचा : 


Padmapani Lifetime Achievement Award: ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा 'पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर