Allu Arjun get 14 Days Judicial Custody : अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Continues below advertisement

Pushpa 2 Stampede Hyderabad :  साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली असून त्याची सरकारी रुग्णालयात त्याची मेडिकल टेस्ट करण्यात आली. एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुनची हैद्राबादच्या गांधी हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आली. त्यावेळी रुग्णालयाच्या आवारात त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं. दरम्यान, अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येतंय. 

हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलिस प्रशासनाना माहिती न देता उपस्थित लावली. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली. अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आलं नाही. परिणामी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. 4 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएरट मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला. 

अल्लू अर्जुनला न्यायालयीन कोठडी

अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पुष्पा फेम अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन अटक केली. त्यानंतर त्याला हैद्राबादच्या गांधी रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी हजर करण्यात आलं. स्टारडम असलेल्या अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी तिथेही गर्दी झाली होती. अल्लू अर्जुनला पाहून त्यावेळीही चाहत्यांनी आरडाओरड सुरू केली.

एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. तसेच त्याला शासकीय रुग्णालयातही मेडिकल टेस्टसाठी नेण्यात आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram