Pushkar Jog On Gujarat Ahmedabad Plane Crash: विमान वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवणारी भ्रष्ट लोक; अहमदाबाद दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्याला राग अनावर, थेट मर्मावर ठेवलं बोट

Pushkar Jog On Gujarat Ahmedabad Plane Crash: मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यामध्ये त्यानं अनेक प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केलाय.

Continues below advertisement

Pushkar Jog On Gujarat Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये (Gujarat Plane Accident) घडलेल्या विमान दुर्घटनेनं अख्खं जग हादरलं. इतिहासातील सर्वा मोठा विमान अपघात असल्याचं सांगितलं जातंय. अहमदाबादहून (Ahmedabad Plane Crash) लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमान टेकऑफच्या काही मिनिटांतच कोसळलं आणि भीषण दुर्घटना घडली. तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान नजीकच्या हॉस्टेलवर कोसळलं आणि मोठा स्फोट होऊन आगीत होरपळलं. विमानातील आणि हॉस्टेलमधील अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. विमानातील एक प्रवाशी चमत्कारिकरित्या अपघातातून सुखरुप बचावला. अपघातात जवळपास 295 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झालेत. दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट करुन अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अशातच एका मराठी अभिनेत्यानं पोस्ट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यासोबतच अभिनेत्यानं दुर्घटनेबाबत संतापही व्यक्त केला आहे. 

Continues below advertisement

मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगनं (Pushkar Jog) त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केलेली. तसेच, त्या पोस्टमध्ये अभिनेत्यानं अनेक प्रश्न उपस्थित केलेत. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

पुष्कर जोग काय म्हणाला? 

अभिनेता पुष्कर जोगनं पोस्टमध्ये म्हटलंय की, "मी सुन्न आहे, नि:शब्द झालोय.. पण एक सांगतो मी अत्यंत संतप्तही आहे. या देशात विमान वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवणारी भ्रष्ट लोक. Boeing आणि Air India यांनी या दुर्घटनेवर उत्तर दिलं पाहिजे आणि जबाबदारी घेतलीच पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळलं जातंय."

"जुनी, तांत्रिकदृष्ट्या मागे पडलेली विमाने अजूनही सेवेत आहेत, याला कोण जबाबदार? शक्य आहे की, मी तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असेनही. पण, खरंच मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. त्या निष्पाप जीवांसाठी फार वाईट वाटतंय. Air India चे CEO, Boeing आणि DGCA डीजीसीएकडून या घटनेवर उत्तरं येणं अपेक्षित आहेत. फक्त शोकसंवेदना पुरेश्या नाहीत. गेलेले लोक पुन्हा येणार नाहीयेत", असंही पुष्करनं म्हटलंय. 


दरम्यान, दुर्घटनाग्रस्त विमानातून एक प्रवासी चमत्कारिक रित्या बचावलाय. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना प्रति कुटुंब एक कोटी देणार असल्याचं एअर इंडियाकडून जाहीर करण्यात आलं आहे. दुर्घटनेनंतर एअर इंडियानं मोठं पाऊल उचललं आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांनी 171 यांनी विमान क्रमांक वापरणं बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. येत्या मंगळवारपासून अहमदाबाद-लंडन गॅटविक मार्गावरील विमानाचा क्रमांक एआय 171 ऐवजी एआय 159 असा असेल. त्यानुसार तिकीट बुकिंग प्रणालीत शुक्रवारपासूनच बदल करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

भारतात माणसाचं आयुष्य स्वस्त झालंय... 4 लोक मेले...; मराठमोळ्या अभिनेत्यानं खूप सुनावलं, नेमकं काय घडलं?

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola