Deep Sidhu Death : पंजाबी सिने-अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू!
Continues below advertisement
deep
Continues below advertisement
1/6
Deep Sidhu Death : पंजाबी सिने-अभिनेता दीप सिद्धूचा (Deep Sidhu) मंगळवारी अपघातात मृत्यू झाला आहे.
2/6
दिल्लीजवळील कुंडली सीमेवर त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात दीप सिद्धूला त्याचा जीव गमवावा लागला आहे.
3/6
सिद्धूसोबत कारमध्ये त्याची मैत्रिणदेखील होती. तीदेखील अपघातात जखमी झाली आहे. सिद्धूची कार एका ट्रॉलीला धडकल्याने हा अपघात झाला आहे.
4/6
दीप सिद्धूची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीला धडकली. दीप सिद्धूचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी खारखोडा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये असलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
5/6
गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणात अभिनेता दीप सिद्धूचे नाव समोर आले होते. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती.
Continues below advertisement
6/6
अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. दीप सिद्धूने न्यायालयात स्वतःला निर्दोष घोषित केले होते.
Published at : 16 Feb 2022 01:27 PM (IST)