Priyanka Chopra,Nick Jonas : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) यांनी या वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी 2022मध्ये आपल्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली होती. सरोगेसीद्वारे प्रियांका आणि निकने त्यांच्या बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मापासून आतापर्यंत प्रियांका आणि निकने बाळाची कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. प्रियांकाला मुलगा झाला की मुलगी, हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या घरी चिमुकल्या परीचे आगम झाले.


लेकीच्या जन्माच्या चार महिन्यानंतरही प्रियांका आणि निकने तिचे नामकरण केले नव्हते. मात्र, आता त्यांच्या लेकीचे नाव समोर आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार निक आणि प्रियांकाने त्यांच्या लेकीचे नाव ‘'मालती मेरी चोप्रा जोनास' (Malti Marie Chopra Jonas) असे ठेवले आहे. या नावात त्यांनी हिंदू आणि ख्रिस्त धर्माचा मिलाफ पाहायला मिळतोय. 'मालती मेरी चोप्रा जोनास' अर्थात हिंदू धर्मानुसार ‘मालती चोप्रा’ आणि ख्रिस्त धर्मानुसार ‘मेरी जोनास’ असे नाव ठेवले आहे.


सरोगेसीद्वारे बाळाचे स्वागत!


प्रियांका आणि निक यांनी 22 जानेवारीला त्यांच्या बाळाच्या जन्माची बातमी शेअर करण्यासाठी एक पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले की, ‘आम्ही सरोगसीद्वारे पालक बनलो आहोत, हे कळवताना खूप आनंद होत आहे. आम्ही आदरपूर्वक या खास प्रसंगी चाहत्यांना गोपनीयता बाळगण्याचे आवाहन करतो. कारण आम्हाला आमचे लक्ष कुटुंबावर केंद्रित करायचे आहे. आभार!'



प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांनी यंदा लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.


हेही वाचा :