PHOTO : सुपरस्टार यश ते रविना टंडन, ‘KGF2’साठी कलाकारांना मिळाले तगडे मानधन!

KGF Chapter 2

1/6
यश, संजय दत्त, रविना टंडन, श्रीनिधी अभिनीत ‘KGF 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील संवाद आणि अॅक्शन सीन प्रेक्षकांना चांगलेच पसंतीस पडले आहेत. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटातील कलाकारांना देखील तगडे मानधन मिळाले आहे.
2/6
रिपोर्टनुसार, यशनं केजीएफ चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी यशनं 15 कोटी मानधन घेतलं होतं. पण आता त्यानं मानधनामध्ये दहा कोटींची वाढ केली आहे. केजीएफ चॅप्टर-2 साठी यशनं 25 कोटी मानधन घेतलं आहे.
3/6
चित्रपटामध्ये संजय दत्तनं अधीरा ही खलनायकाची भूमिका साकारली आहे. अधीरा ही भूमिका साकारण्यासाठी संजय दत्तनं नऊ कोटी रूपये फी घेतली आहे.
4/6
हा चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या प्रशांत नील यांनी चित्रपटासाठी 15 कोटी रुपये फी म्हणून आकारले आहेत.
5/6
‘केजीएफ 2’मध्ये ‘रीना’ची भूमिका साकारणाऱ्या श्रीनिधीला या चित्रपटासाठी तब्बल 3 कोटींचे मानधन मिळाले आहे.
6/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिने देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिनं या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 1.5 कोटी फी घेतली आहे.
Sponsored Links by Taboola