Netflix : चित्रपट, वेब सीरिज, डॉक्यूमेंट्री इत्यादी पाहण्यासाठी अनेक लोक  नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफोर्मचा वापर करतात. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स कंपनी आता लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. फॅमिलीमधील लोक सोडून इतर व्यक्तींसोबत नेटफ्लिक्स अकाऊंट शेअर करणाऱ्या युझर्सला आता जास्त पैसे भरावे लागणार आहेत. 


रिपोर्टनुसार, मार्च महिन्यामध्ये कंपनीनं नव्या नियमाचे परीक्षण चिली, कोस्टारिका आणि पेरु येथे सुरू केले पण आता पुढच्या वर्षापासून हा नियम जागतिक स्तरावार लागु करण्याचा विचार नेटफ्लिक्स ही कंपनी करत आहे. 


नेटफ्लिक्स कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या नव्या फिचरचं टेस्टिंग करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल. जे युझर्स त्यांच्या कुटुंबाबाहेरील लोकांसोबत अकाऊंट शेअर करतील त्यांच्याकडून किती शुल्क आकारले जाऊ शकते? हे टेस्टिंग केल्यानंतर सुनिश्चित केले जाऊ शकते. कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी ग्रेग पीटर्स यांनी सांगितले की, कंपनी गेली दोन वर्षे या फिचरवर काम करत आहे.


नेटफ्लिक्सचे 100 दिवसांत लाखोंनी सब्सक्रायबर्स घटले
जवळपास 100 दिवसांमध्ये नेटफ्लिक्सचे दोन लाखपेक्षा जास्त सब्सक्रायबर्स कमी झाले आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तीन महिन्यांमध्ये नेटफ्लिक्स युझरची संख्या 221.6 मिलियन झाली आहे. नेटफ्लिक्स कंपनीनं दावा केला आहे की, सब्सक्रायबर्स कमी होण्याचं कारण रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध आहे. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सनं रशियामध्ये त्यांची सेवा बंद केली आहे. तसेच कोरोनामुळे अनेक लोक वर्क-फ्रॉम होम करत आहेत. यामुळे 2020 मध्ये कंपनीचा ग्रोथ रेट  वाढला होता. पण अनेक लोक त्यांच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सोडून इतर व्यक्तींना देखील त्यांच्या नेटफ्लिक्सच्या अकाऊंटचे डिटेल्स देत होते. त्यामुळे देखील नेटफ्लिक्सचे नुकसान झाले, असं ही कंपनीनं सांगितलं. 


संबंधित बातम्या