The Kapil Sharma Show : येत्या रविवारी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) 'रनवे 34' (Runway 34) चित्रपटातील कलाकार मंडळी अर्थात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh), आकांक्षा सिंह आणि अंगिरा धार यांचे आगमन होणार आहे. चित्रपटाबाबत बोलताना महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दिग्दर्शित करण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न कपिल शर्मा अजय देवगण यांना विचारताना दिसणार आहे.


आपल्या या अनुभवाचे कथन करताना अजय देवगण म्हणाला की, ‘याबाबत खूप सांगण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही... अमितजी हे अमितजी आहेत... एक महान व्यक्तिमत्व! त्यांच्याकडून नेहमीच खूप काही शिकायला मिळतं. त्यांना व त्यांचे चित्रपट पाहत मी लहानाचा मोठा झालो आहे. आमच्यात एक कम्फर्ट झोन आहे, यामुळे त्यांना दिग्दर्शित करण्यात कसलाही अवघडलेपण नव्हता. ते सगळ्याच दिग्दर्शकांचे आवडते अभिनेते आहेत. आपल्याला त्यांच्याकडून जे करून घ्यायचे आहे, ते अमितजी अचूकपणे करतात. खरं तर ते आपल्याला प्रेरित करत असतात!’


अमरीश पुरी पितृतुल्य!


यावेळी त्यांना दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांची देखील आठवण आली. अजय देवगणने दिवंगत अभिनेते अमरीश पुरीजी यांच्यासोबत 1991 मधील ‘फूल और कांटे' चित्रपटात काम करतानाचा अनुभवही शेअर केला. अजय म्हणाला, ‘अमरीशजी हे माझ्यासाठी जणू पितृतुल्य व्यक्ती होते. या चित्रपटसृष्टीत आजवर मी ओळखत असलेल्या सर्वात चांगल्या व्यक्तींपैकी ते एक होते.’


एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट


अजय देवगणचा ‘रनवे 34’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. अजय देवगण प्रवासी आणि संपूर्ण फ्लाइट क्रूचा जीव धोक्यात घालून सिनेप्रेमींना एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे. या घटनेनंतर, त्याला चौकशीला सामोरे जावे लागते, ज्या दरम्यान त्याने त्याच्या स्व:सन्मानाचे रक्षण केले आहे.


संबंधित बातम्या