Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाच्या चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेनं पाहात असतात. लवकरच तिची  Citadel ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजच्या शूटिंगमध्ये प्रियांका सध्या व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकानं या वेब सीरिजच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता तिनं नुकताच एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाच्या चेहऱ्याला रक्त लागलेलं दिसत आहे. हा फोटो  पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. 


प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झालेली दिसत आहे. फोटो शेअर करुन प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुमचा देखील दिवस एवढाच कठिण होता?' कॅप्शनमध्ये अॅक्टर्स लाइफ आणि Citadel या हॅशटॅगचा वापर प्रियांकानं केला आहे. प्रियांकाच्या या फोटो कमेंट करुन एका नेटकऱ्यानं विचारलं, 'चेहऱ्याला नक्की काय झालं आहे?' 






 प्रियांकाने शेअर केला लेकीचा फोटो
मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने रात्री उशिरा तिच्या चिमुकलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या मुलीचा चेहरा दिसत नसला तरी चाहत्यांसाठी मुलीची फक्त एक झलक पुरेशी आहे. प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये पती निक जोनासही तिच्यासोबत दिसत आहे. प्रियांकाने बाळाला छातीशी कवटाळलं आहे तर निक त्याच्या लेकीकडे प्रेमाने पाहत आहे.


मुलीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास'
प्रियांका आणि निकच्या मुलीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास' असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. आता स्वतः प्रियांकाने याला दुजोरा दिल्याचं दिसतं. या पोस्टमध्ये प्रियांका चोप्राने आपल्या मुलीला 'एमएम' म्हटलं आहे, ज्याचा अर्थ 'मालती मेरी' असू शकतो. यासोबतच प्रियांका हिंदू आणि निक ख्रिश्चन असून या मुलीच्या नावात हे दोन्ही झळकतं. पती ख्रिश्चन असल्याने प्रियांका चोप्राने मुलीच्या नावासोबत मेरी जोडलं आहे. शिवाय तिने मुलीच्या नावात दोघांचीही आडनावं लावली आहेत.


हेही वाचा :