UPSC NDA 2 Exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे UPSC घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि नौदल अकादमीच्या दुसऱ्या परीक्षेचं नोटिफिकेशन आज 18 मे रोजी जारी होण्याची शक्यता आहे. या परीक्षेचं नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाईटवर https://upsc.gov.in/ जाऊन परीक्षेसाठी अर्ज भरु शकणार आहेत. या परीक्षेसाठी 12 वी पास उमेदवार पात्र असणार आहेत.
परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 7 जून 2022 पर्यंत असणार आहे. परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना मुलाखत द्यावी लागणार आहे, त्यानंतर उमेदवारांची निवड होणार आहे.
एनडीए आणि एनएच्या दुसऱ्या परीक्षेसाठी नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर अर्ज करण्याची लिंक अॅक्टिव्ह होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. आपला लॉगिन वापरुन तिथली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रं अपलोड केल्यानंतर सबमिट करायचा आहे.
यूपीएससी एनडीएची दुसरी परीक्षा 4 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत घोषित केला जाण्याची शक्यता आहे. आता विद्यार्थ्यांसह पालकांना देखील या परीक्षेच्या नोटिफिकेशनची प्रतीक्षा आहे.
UPSC NDA, CDS II 2022: अर्ज कसा भरायचा
1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या upsconline.nic.in किंवा https://upsc.gov.in/ वर क्लिक करा
2: NDA किंवा CDS ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
3: प्रथम नोंदणी करा आणि लॉगिन क्रेडेन्शियल तयार करा.
4: लॉगिन करा आणि ऑनलाइन अर्ज भरा.
5: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज तसेच फी भरा.
6: अर्ज सबमिट करा. भविष्यातील वापरासाठी, अंतिम अर्जाची प्रत जतन करा.
इतर महत्वाच्या बातम्या
HSC Exam : NDA ची मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा, बोर्डाकडून 'एबीपी माझा' च्या बातमीची दखल
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI