bollywood actress mangalsutra : बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. कधी डिझायनर ड्रेस तर कधी लक्झरी गाड्या सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष असतं. नुकताच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनी चंदीगढमधील ओबोरॉय सुखविलास रिसॉर्टमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नसोहळ्यानंतर पत्रलेखा आणि राजकुमार मुंबईमध्ये आले. एअरपोर्टवरील या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमधील पत्रलेखाच्या मंगळसूत्राने अनेकांचा लक्ष वेधले आहे.  पत्रलेखाचं मंगळसूत्र डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलं आहे. तिच्या स्टायलिश मंगळसूत्राची किंमत 1,65,000 रूपये आहे. जाणून घेऊयात बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांच्या डिझाइन आणि किंमतींबाबत...


ऐश्वर्या राय  
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चनने 2007मध्ये लग्नगाठ बांधली. ऐश्वर्याच्या डायमंड पेंडेंट आणि सोन्याची चैन असणाऱ्या मंगळसूत्राची किंमत 45 लाख रूपये आहे. 
 
दीपिका पादूकोण 
बॉलिवूडमधील नेहमी चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि अभिनेता रणवीर सिंह. 14 नोव्हेंबर 2018 रोजी रणवीर दीपिकाचा शाही विविह सोहळा पार पडला. दीपिकाच्या सिंगल डायमंड पेंडेंट मंगळसूत्रची  हे 20 लाख रूपये आहे.   


यामी गौतम 
अभिनेत्री यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरसोबत 4 जून 2021 रोजी लग्नगाठ बांधली. यामीच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होतो. तिच्या या फोटोमधील मंगळसूत्राने अनेकांचे लक्ष वेधले. यामीच्या  डिझायनर मंगळसूत्राची किंमत 3.49 लाख रुपये आहे.  


Ranbir Kapoor-Shraddha Kapoor : लव रंजनचा नवा चित्रपट; रणबीर- श्रद्धा पहिल्यांदाच एकत्र, चाहते उत्सुक


अनिष्का शर्मा
अनुष्का आणि विराटची जोडी विरूष्का या नावाने ओळखली जाते. त्यांनी 2017 लग्नगाठ बांधल. अनुष्काचं मंगळसूत्र डायमंड आणि काळ्या रंगाच्या मोत्यांनी तायार करण्यात आलं आहे. तिच्या या मंगळसूत्राची किंमत 52 लाख आहे. 


Vicky Kaushal Propose Katrina : 'मुझसे शादी करोगी' सलमानसमोरच विकीनं केलं कतरिनाला प्रपोज ; मग पुढे जे झालं ते...