Priyanaka Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक कलाकारांच्या शुटींगदरम्यानचे, कार्यक्रमांदरम्यानचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एका अभिनेत्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही अभिनेत्री चक्क भीक मागताना दिसत आहे. पण ही अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडलाय. बिग बॉसच्या (Bigg Boss) कार्यक्रमातून प्रत्येक घरात पोहचलेली ही अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झालीये. 


या व्हिडिओमध्ये ही अभिनेत्री भीक मागताना दिसत आहे. दरम्यान ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी आहे. पण तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका का व्हायरल झाला याचं देखील उत्तर अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडिओतून देण्यात आलं आहे. नेमका हा सगळा काय प्रकार आहे, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


सोशल मीडियावर प्रियांकाचा व्हिडिओ व्हायरल


प्रियांका अत्यंत घाणेरड्या कपड्यांवर एका हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसली. मात्र तिला गेटवरच अडवण्यात आलं. तिच्यासोबत एक छोटा मुलगा देखील आहे. या व्हिडिओमध्ये ती भीक मागतानाही दिसत होती. पण प्रियांकाच्या या व्हिडिओमागचं कारण म्हणजे, तिचा लवकरच एक म्युझिक अल्बम येणार आहे. या गाण्याच्या शुटींगदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेअर करताना प्रियांकाने त्याला कॅप्शन देखील दिलं आहे. त्यामध्ये तिनं म्हटलं की,  Bahte hai na bahte hai na, aansu mere bahte hai na, Keep watching and loving ‘Dost Banke’ 






राहत फतेह अली खान आणि गुरनजार चठ्ठा या दोघांचं हे गाणं आहे. या गाण्यात प्रियांका चौधरी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रेमात फसवणूक झालेल्या महिलेची भूमिका ती गाण्यात साकारणार आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे प्रियांकाच्या अभिनयाचं देखील अनेकांन कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय. 'गठबंधन' या कार्यक्रमातून प्रियांकाने तिच्या सिनेसृष्टीच्या प्रवासाला सुरुवात केली. पण तिला खरी ओळख मिळाली ते  उडियान या कार्यक्रमातून. त्यानंतर प्रियांका बिग बॉस 16 चा देखील भाग राहिली आहे.  


ही बातमी वाचा : 


Arbaaz Khan : 'आमच्या जवळच्या लोकांना वाटतंय हा पब्लिसिटी स्टंट',टीका करणाऱ्यांना अरबाज खानने फटकारलं