Priya Bapat : 'मुन्नाभाई' या सिनेमातून अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण त्यानंतर तिने बॉलिवूडपेक्षा मराठी सिनेमा, नाटकं, मालिका यामधून प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन केल्याचं पाहायला मिळालं. मराठीतल्या तिच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांकडूनही भरभरुन कौतुक झालं. मुन्नाभाईनंतर प्रिया कोणत्याही बॉलिवूड सिनेमात झळकली नव्हती. पण नुकताच तिचा विस्फोट हा बॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


दरम्यान मुन्नाभाईनंतर बॉलिवूडमध्ये काम करायलं एवढी वर्ष का लागली असा प्रश्न सध्या प्रियाला वारंवार विचारण्यात येतोय. यावर प्रियानेच एक सोशल मीडिया पोस्ट करत या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. तसेच तिच्या या भूमिकेविषयीही प्रियाने भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे रितेश देशमुखसोबत प्रिया या सिनेमात दिसली आहे. त्यामुळे एका मराठीमोळ्या जोडीचा हा बॉलिवूड सिनेमा आहे. 


प्रियाची पोस्ट नेमकी काय?


प्रियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की,  ही विस्फोटमधली तारा, माझा पहिला हिंदी सिनेमा. मुन्नाभाईनंतर तुला हिंदी सिनेमांकडे पुन्हा वळायला एवढा वेळ का लागला असा प्रश्न मला प्रत्येकाने विचारला. खरंतर मी हे कधीच प्लॅन केलं नव्हतं. माझ्या प्रवासाने मला इथवर आणून सोडलं आहे आणि जेव्हा संधी मिळाली ती मी सोडली नाही. 


'हे एक नवं पाऊल...'


तुमच्यातल्या अनेकांना तारा आवडली, तर काहींनी तिने तिच्या नवऱ्याला फसवलं म्हणून तिचा रागही केला. कोणतंही जजमेंट न करता तिची भावनिक स्थिती समजून घेणं, हा प्रवास फार रंजक होता. ताराची भूमिका करण्याचं आणखी एक मुख्य कारणं म्हणजे  तिला तिची मतं आहेत, ती बिनधास्त आहे आणि तिला तिची खरी परिस्थिती माहितीये. बरोबर किंवा अयोग्य हे नेहमीच व्यक्तिनिष्ठ असतं. पण स्वतःचा आनंद शोधणारी स्त्री साकारणं हे पितृसत्ताकतेमधलं एक नवं पाऊल आहे. 


'ही भूमिका एक आव्हान...'


ही भूमिका साकारणं एक आव्हान होतं आणि एक अभिनेत्री एखाद्या भूमिकेमध्ये आव्हानांशिवाय आणखी काय मागू शकते? रितेश देशमुख सर फक्त एक उत्तम अभिनेताच नाही तर चांगला सह कलाकार म्हणूनही तुम्हाला खूप खूप थ्यँक्यू. तुमच्यासोबतचा प्रत्येक सीन हा तुमच्या उत्तम अभिनयामुळे शक्य झाला.  






ही बातमी वाचा : 


Deepika Padukone : मुलीसाठी नॅनी नाही ठेवणार दीपिका पादुकोण? 'या' अभिनेत्रींसारखं करणार पॅरेंटिंग?