Deepika Padukone Not Hire Nanny For Daughter: बॉलिवूडच्या सुपरस्टार कपल दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे दोघेही नुकतेच आईबाबा झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत केलं. तेव्हापासून अनेक सेलिब्रिटी आणि चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. शाहरुख खानपासून ते अंबानीपर्यंत दीपिका आणि तिच्या मुलीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहचले.
साधारणपणे सगळे सेलिब्रेटी आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी नॅनी ठेवतात. पण दीपिका तिच्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी नॅनी ठेवणार नसल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे आलिया जसं तिच्या मुलीचा सांभाळ करते त्याचप्रमाणे दीपिकाही तिच्या मुलीचा सांभाळ करणार असल्याचं म्हटलं जातंय.
दीपिका पदुकोण आपल्या मुलीसाठी नॅनी ठेवणार नाही?
रणवीर सिंग आपल्या मुलीच्या पालकत्वासाठी रणबीर कपूरची पॅरेंटिंग स्टाईल फॉलो करू शकतो, असं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे दीपिका आलिया भट्ट, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या पॅरेटिंगची स्टाईल निवडू शकते.
बॉलीवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितले की दीपिका पदुकोण तिच्या मुलीच्या संगोपनासाठी ऐश्वर्या राय बच्चनला फॉलो करू शकते.ऐश्वर्या राय बच्चनने आराध्यासाठी कोणतीही नॅनी ठेवली नव्हती आणि तिने स्वत:हून तिच्या मुलीचा सांभाळ केला. अगदी जया बच्चन यांनी तिला 'हँड-ऑन-मॉम' असा टॅग दिला होता. तर, दीपिका तिच्या मुलीसाठीही हाच मार्ग स्वीकारू शकते.
आलिया-अनुष्काची पॅरेंटिंग स्टाइल करु शकते फॉलो
दरम्यान दीपिका ऐश्वर्या राय बच्चनच नाही तर आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा यांचीही पॅरेंटिंग स्टाईल फॉलो करु शकते. तसेच ते दोघेही आपल्या मुलीला मीडियापासून दूरच ठेवू शकतात. त्यांची मुलगी थोडी मोठी झाल्यावरच ते तिला कॅमेऱ्यासमोर आणतील असं म्हटलं जातंय.
दीपिका-रणवीरने केलं त्यांच्या बाळाचं स्वागत
रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या सोशल मीडियावरुन त्यांच्या बाळाचं स्वागत केलं. दरम्यान अनेक मुलाखतींमध्ये बोलताना रणवीरने त्याला मुलगी हवी असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे त्याला दीपिकाच्या लहानपणीचे फोटो बघायलाही फार आवडतं असंही त्याने म्हटलं होतं. त्यातच आता त्याला मुलगी झाल्यामुळे त्याची इच्छा पूर्ण झाल्याचं म्हटलं जातंय.