Priya Bapat : नुकत्याच पार पडलेल्या 'झी चित्र गौरव पुरस्कार' (Zee Chitra Gaurav Awards) सोहळ्यात अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिला मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. प्रिया ही तिच्या अभिनयाच्या जोरावर आजपर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे. अनेक हिंदी मराठी सिनेमांसह प्रियाने ओटीटीवरही तिच्या अभिनयाचा छाप सोडली आहे. प्रिया ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. 


झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात मागील काही वर्षांपासून मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार प्रिया बापटला दिला जातो. प्रियाने तिचा हा फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. तसेच या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रियाने रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे तिने तिच्या आईवडिलांचे आणि तिचा नवरा आणि अभिनेता उमेश कामतला देखील यावेळी थँक्यू म्हटलंय. 


प्रियाने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलं? 


मराठी पाउल पडते पुढे” आपल्या यशाचं कौतुक होत, पण तिथपर्यंत पोहोचण्याच्य प्रवासाला शाबासकी मिळणं हे जास्त Special आहे. आपल्या कष्टांची, मेहनतीची दखल घेउन त्यातून मिळवलेल्या यशाबद्दल उभ्या महाराष्ट्राला अभिमान वाटणं हे खूप मानाचं आहे. आज हा पुरस्कार स्विकारकाना मन भरून आलं. माझा अभिनेत्री म्हणून आजपर्यंतच्या प्रवासातले सगळे दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार, विद्या ताई सर्वांना खूप खूप धन्यवाद.झी मराठी या मानासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मोठी झेप घेउ पाहणाऱ्या माझ्या पंखांना बळ देणाऱ्या आई- वडिलांना नमस्कार. माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास दाखवून मला नवं आकाश खुलं करून देणाऱ्या नागेश कुकनूर यांना मनःपूर्वक धन्यवाद. श्वेता तुला खूप खूप प्रेम , मुकुंद मेन्शन माझं कुटुंब आहे आणि राहील. आणि कायम माझ्या सोबत, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून प्रेम करणारा उमेश, अशी पोस्ट प्रियाने केली आहे. 






प्रियाचा अभिनयाचा प्रवास


प्रिया बापटने आतापर्यंत अनेक मालिकांमधून तसेच नाटक आणि वेब वेबशोमध्ये काम केलं आहे.  वजनदार, टाइमपास 2,आंधळी कोशिंबीर, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच तिने लगे राहो मुन्ना भाई आणि मुन्ना भाई एम.बी.बी.एस हिंदी चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच आता ती रात जवान हैं या वेबशोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Shubhangi Gokhale Social Media Post : 'पंधरा वीसवर्षांपासून नुसता वैताग आणलाय...', शुभांगी गोखलेंची संतप्त फेसबुक पोस्ट चर्चेत, नेमकं प्रकरण काय?