मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार (Virat Kohli) विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) , त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी अत्यंत उत्सुक आहेत. अनुष्का सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणातील प्रवास सर्वांच्या भेटीला आणत आहे. आता नुकतेच अनुष्काने तिचे बेबी बंप फोटोशूट केले आहे.


अनुष्काने तिचे हे लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊन्टवरुन शेअर केले आहेत. अनुष्काने वोग या प्रसिद्ध मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. जानेवारी 2021 च्या एडिशनसाठी हे फोटोशूट केले आहे.  विशेष म्हणजे या फोटोंमध्ये ती बोल्ड दिसत आहे. अनुष्काचे हे बेबी बंपसोबतचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.





अनुष्काचे हे फोटो पाहिल्यानंतर त्याच्यावर कमेंट करण्याचा मोह विराटलादेखील आवरता आला नाही. विशेष म्हणजे अनुष्काने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर त्याने कमेंट केली आहे. विराटने "अतिशय सुंदर" अशी कमेंट केली आहे.



दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अनुष्का आणि विराटनं सोशल मीडियाच्या आधारे त्यांच्या जीवनात येणाऱ्या या नव्या पाहुण्याची माहिती सर्वांनाच दिली होती. ज्यानंतर या जोडीवर अमाप शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.





विराट लवकरच बाबा बनणार असून तो पॅटर्निटी लीव्ह घेऊन भारतात आला आहे. अनुष्का शर्माची प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावं यासाठी तो भारतात परतला आहे.