Snehal Tarde : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे (Pravin Tarde) यांची पत्नी स्नेहल तरडे (Snehal Tarde) देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री या कायमच त्यांच्या विविध गोष्टींमुळे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, कधी त्यांचं वैयक्तिक आयुष्य तर कधी त्यांच्या आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. पण स्नेहल सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. शिक्षणाला वय नसतं, असं म्हणतात ते योग्यच आहे, हे सिद्ध करत स्नेहलने थेट वेदांचा अभ्यास पूर्ण केला आहे.
प्रविण तरडे यांच्या महाराजांच्या सिनेमातील भूमिका असोत किंवा त्यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार असतो, प्रत्येक कारणांमुळे ते कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यातच आता त्यांच्या पत्नीने वेदांचा अभ्यास पूर्ण केला असल्याची माहिती तिच्या सोशल मीडियावरुन दिली. हिंदु धर्मात वेद, शास्त्र, पुराणं यांना विशेष महत्त्व आहे. त्याच वेदांचा अभ्यास पूर्ण केला आहे. याविषयी सोनलने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
स्नेहलची पोस्ट नेमकी काय?
स्नेहलने तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटलं की, वेदांचा अभ्यास', स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला सर्वश्रेष्ठ मानताना तो धर्म ज्या चार वेदांवर आधारीत आहे त्या वेदांचा मी योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नाही याची खंत मला अनेक दिवस सतावत होती. पुण्यातील भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम या संस्थेतर्फे Study of Vedas या अभ्यासक्रमात 78 टक्के मिळवून आज ती खंत मी दूर केली. भारतातील अनेक मान्यवर गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे या विषयात आता आणखी खोलवर जाण्याची प्रेरणा मला मिळाली आहे, आशीर्वाद असावा.
स्नेहलच्या या पोस्टवर अनेकांनी तिचं अभिनंदन करत कौतुक केलं आहे. स्नेहलही अनेक सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनेक सिनेमातील तिच्या भूमिकांनी विशेष लक्ष देखील वेधून घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता तिच्या या अभ्यासामुळेही ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असल्याचं पाहायला मिळतंय.