Web Series On Mahatma Gandhi : प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) यांची नवी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लेखक रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांच्या 'गांधी बिफोर इंडिया' आणि 'गांधी-द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड' या दोन पुस्तकांवर हंसल मेहता यांची ही नवी वेब सीरिज आधारित असणार आहे. हंसल मेहता यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन माहिती दिली. या सीरिजमध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची भूमिका अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) हा साकारणार आहे.
स्कॅम 1992 या वेब सीरिजमध्ये प्रतीक गांधीनं हर्षद मेहताची भूमिका साकारली होती. या सीरिजमुळे प्रतीकला विशेष लोकप्रियता मिळाली. स्कॅम 1992 या सीरिजचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं होतं. आता प्रतीक आणि हंसल मेहता यांच्या महात्मा गांधींच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.
एका मुलाखतीमध्ये हंसल मेहता यांनी सांगितलं, 'जेव्हा तुम्ही महात्मा गांधींसारख्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलता, तेव्हा चित्रपट निर्माता म्हणून तुमच्यावर आधीच मोठी जबाबदारी असते.' या सीरिजमध्ये महात्मा गांधींचे जीवन आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका दाखवण्यात येणार आहे.
हंसल मेहता यांची पोस्ट:
हंसल मेहता यांची 'स्कूप' ही वेब सीरिज देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पत्रकार जिग्ना वोरा यांच्या 'बिहाइंड द बार्स इन भायखळा: माय डेज इन प्रिझन' या पुस्तकावर आधारित या वेबसीरिजचे कथानक असणार आहे. अभिनेत्री करिश्मा तन्ना 'स्कूप' या वेबसीरिजमध्ये जिग्ना वोरा यांची भूमिका साकारणार आहे. तर प्रतीक गांधीचा 'फुले' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा: