Hansal Mehta  : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) हे 54 व्या वर्षी लग्नबंधनात अडकले आहेत. हंसल मेहता यांनी त्यांच्या लाँग टाइम लिव्ह इन पार्टनरसोबत म्हणजेच सफीना हुसैन (Safeena Husain) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. हंसल मेहता यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


हंसल मेहता यांनी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. हंसल मेहता यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, '17 वर्षानंतर आपल्या मुलांना मोठं होताना पाहात असताना तसेच स्वत:ची स्वप्न पूर्ण करत असताना आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जीवनातील इतर गोष्टींसारखेच हे पण अचानक पद्धतीनं घडलं. प्रेम हे इतर गोष्टींवर विजय मिळवते. '


हंसल मेहता यांना अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता राजकुमार रावनं कमेंट करत लिहिलं, 'माझ्या सर्वात आवडत्या जोडीला मी शुभेच्छा देतो.' तसेच मनोज बाजपेयी, हुमा कुरेशी, विशाल भारद्वाज यांनी देखील हंसल मेहता यांना शुभेच्छ दिल्या. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच अगदी साध्या पद्धतीनं हंसल मोहता यांचा विवाह सोहळा पार पडला.







 हंसल मेहता आणि सफीना यांना दोन मुली आहेत. हंसल मेहता यांच्या स्कॅम 1992 या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


संबंधित बातम्या