Prathana Behere : आपल्या अभिनयाने आणि सुंदर अदाकारींनी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prathana Behere) ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टना देखील तितकीच पसंती मिळते. त्यामुळे प्रार्थनाच चाहतावर्गही मोठा आहे. नुकताच प्रार्थानाने तिच्या सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत माहेरी जात असल्याचं दिसत आहे. प्रार्थना अभिषेकला घेऊन तिच्या गावी गेलीये. 


मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची असलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सध्या तिच्या नवऱ्यासोबत तिच्या माहेरी कोकणात गेली आहे. खरंतर प्रार्थना आणि तिचा नवरा हा काही वर्षांपूर्वीच कोकणात म्हणजेच अलिबागला राहायला गेले आहेत. प्रार्थनाने मुंबई सोडल्यानंतर ती बरीच चर्चेत आली होती. त्यातच तिने नुकतच कोकणात बोटीवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा एका प्रार्थनाचं कोकण प्रेम पाहायला मिळालं आहे. 


प्रार्थानाने शेअर केला व्हिडिओ


प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने हिच्या घोवाला कोकण दाखवा.. असं कॅप्शन लिहिलं आहे. त्याचप्रमाणे कोकणची चेडवा हो नाखवा हे गाणं तिने या व्हिडिओला लावलं आहे. सध्या प्रार्थनाच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. तसेच तिचा हा व्हिडिओ अनेकांच्यां पसंतीस देखील पडत असल्याचं पाहायला मिळतंय. 


प्रार्थानाने मुंबई का सोडली?


अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नुकतीच अलिबागला राहण्यास गेली आहे. यामागचं कारण सांगताना प्रार्थना म्हणाली की, आमची अलिबागला जागा होती. कोविडच्या आधी आम्ही ती घेतली होती. पण कोविडच्या दरम्यान आम्ही ठरवलं की ती जागा आता डेव्हलप करायची आणि अलिबागवरुन प्रवास करणं तसं सोपं आहे. त्याचप्रमाणे आमचे तिथे घोडे, गाई, कुत्रे असं सगळं आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याला आठवड्यातले 4 दिवस तिथे जावं लागायचं.  जोपर्यंत मी मालिकेचं शुटींग करत होते, तोपर्यंत मी मुंबईतच होते. पण इथे प्रदूषण असं नाही, पण खूप गर्दी वाटायची.  






ही बातमी वाचा : 


Jitendra Awhad : आता 'हम दो हमारे बारह' सिनेमावरुन वाद, जितेंद्र आव्हाड म्हणाले, 10 मुलं असलेलं एक कुटुंब दाखवा, 11 लाख देतो!