Pratap Pothen : प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक असणाऱ्या प्रताप पोथेन (Pratap Pothen) यांचे निधन झाले आहे. चेन्नईमधील (Chennai) राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. 


प्रताप बोथेन यांनी मार्थंडन आणि शिवलापेरी पांडी या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी अशा भाषांमधील 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. प्रताप पोथेन यांनी पन्नीर पुष्पमंगल, आलियाथा गोलामंगल, मुदु बानी या तमिळ चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. 


18  एप्रिल1952 मध्ये तिरुवनंतपुरम येथे प्रताप बोथेन यांचा जन्म झाला. प्रताप हे 15 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी 1985 मध्ये अभिनेत्री राधिका यांच्यासोबत लग्न केलं. पण राधिका आणि प्रताप यांचा संसार काळ टिकला नाही. 1986 मध्ये राधिका आणि प्रताप यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी 1990 मध्ये अमला सत्यनाथ यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. अमला आणि प्रताप यांना कीया नावाची मुलगी आहे. 2012 साली प्रताप बोथेन यांनी अमला सत्यनाथ यांच्यासोबत घटस्फोट घेतला. प्रताप बोथेन यांनी  भारतन यांच्या 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आरावम' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या मीदुम ओरु कथल कथाई या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. 


त्यांच्या चामाराम, ठकार, पप्पू, इडवेला, कैकेयी, अक्षरंगल, ओण्णू मुठल पूज्यम वारे, आणि थनमाथरा या प्रताप पोथेन यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ‘जीव’, ‘सीवलापेरी पंडी’ आणि ‘लकी मॅन’ या चित्रपटातील प्रताप पोथेन यांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टमधून श्रद्धांजली वाहिली आहे. 


हेही वाचा: