Italy PM Mario Draghi Resigns : एकीकडे भारतामध्ये (India) महाराष्ट्रात मोठा (Maharashtra Political Crisis) राजकीय भूकंप झाला, त्यानंतर ब्रिटनमध्येही (Britain) सत्ताबदल पाहायला मिळत असताना आता इटलीमध्येही मोठा राजकीय भूकंप आला आहे. पंतप्रधान मारियो द्राघी (Mario Draghi) यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत सत्तेत असणाऱ्या युतीमधील पक्षांनी विश्वासदर्शक ठरावात साथ न दिल्याने पंतप्रधान (Italy PM) मारियो द्राघी (Mario Draghi) यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इटलीचे राष्ट्रपती (President of Italy) सर्जियो मट्टरेल्ला (Sergio Mattarella) यांनी द्राघी यांचा राजीनामा नाकारत, द्राघी यांनी संसदेला संबोधित करत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. 


मारियो द्राघी यांच्या पक्षासोबतच्या युतीतील दुसरा पक्ष असणाऱ्या फाईव्ह स्टार मुव्हमेंट (M5S) पक्षाने विश्वास दर्शक ठरावात मतदान करणं टाळल्याने मारियो द्राघी यांनी औपचारिकपणे पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. द्राघी यांच्या सरकारविरोधात संसदेत वाढत्या महागाईवरून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी मारियो द्राघी यांच्या पक्षासोबतच्या युतीमध्ये असणाऱ्या फाईव्ह स्टार मुव्हमेंट (M5S) पक्षाने विश्वास दर्शक ठरावासाठीच्या मतदानावर बहिष्कार टाकला.


द्राघी 2021 पासून इटलीचे पंतप्रधान
द्राघी यांच्या युतीतील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला फाईव्ह स्टार मुव्हमेंट (M5S) पक्षाने विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकल्याने द्राघी यांचं सरकार अडचणीत आलं. त्यानंतर द्राघी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. द्राघी 2021 पासून इटलीच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत. सरकारी वृतसंस्थेनुसार, द्राघी यांनी म्हटलं की, 'मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहील करतो.'


'एकता नसलेल्या सरकारचं नेतृत्त्व करु शकत नाही'
विश्वासदर्शक ठरावाकडे युतीतील पक्षाने पाठ फिरवल्याने द्राघी यांचं सरकार धोक्यात आलं. यावर प्रतिक्रिया देत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी द्राघी यांनी सांगितलं की, 'संसदेत झालेलं मतदान फार महत्त्वाचं होतं. विश्वासदर्शक ठरावात सरकारच्या बाजूने 172 तर विरोधात 39 मते पडली. सरकार वाचलं. पण युतीतील पक्षाने मतदानावरच बहिष्कार टाकल्याने एकता नसलेल्या सरकारचं नेतृत्त्व करु शकत नाही', अशी भूमिका द्राघी यांना घेतली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या