Tarun Majumdar Death : बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक तरुण मजुमदार (Tarun Majumdar) यांचे आज (सोमवार) कोलकाता (Kolkata) येथील रुग्णालयात निधन झाले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे तरुण मजुमदार हे आकर्षक कथांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जात होते. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  मजुमदार यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सरकारी एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते. वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले. 1985 मध्ये तरुण मजुमदार यांनी अलोर पिपाशा या चित्रपटामधून दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.


प्रसिद्ध कलाकारांसोबत तरुण मुजमदार यांनी केलं काम



उत्तम कुमार, सुचित्रा सेन, छबी बिस्वास, सौमित्र चटर्जी आणि संध्या रॉय या प्रसिद्ध कलाकारांसोबत तरुण मजुमदार यांनी काम केलं. 


या चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती 


1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या बालिका बधू या चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली. तसेच त्यांच्या कुहेली (1971), श्रीमन पृथ्वीराज (1972) and दादर कीर्ती (1980) , गणदेवता, आलो या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांचा गणदेवता हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला बंगाली चित्रपट ठरला. 


अनेक पुरस्कारांनी करण्यात आलं सन्मानित


तरुण मजुमदार यांना 1990 मध्ये पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. त्यांना 2021 मध्ये जीवनगौरव पुरस्कारासह पाच फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.


2015 मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये तरुण मजुमदार यांनी त्यांच्या चित्रपटांबाबत सांगितलं, 'मला नेहमीच मानवी नातेसंबंध आणि मूल्ये या गोष्टींबद्दल उत्सुकता वाटत होती. मला वाटते की मी मध्यमवर्गीय लोकांच्या समस्या मला अधिक चांगल्या प्रकारे समजतात.'


हेही वाचा: