Prasad Oak : धर्मवीर-2 या सिनेमासाठी सध्या प्रेक्षक बरेच उत्सुक आहेत. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने साकारलेली आनंद दिघे यांच्या भूमिकेच भरभरुन कौतुक झालं. त्याचप्रमाणे मागील अनेक दिवसांपासून प्रसादच्या कलाकृतींचं बरंच कौतुक होत आहे. अनेक सिनेमांची भेट प्रसादने आतापर्यंत प्रेक्षकांना दिली आहे. पण आता प्रसादला मिळालेली एका भेटीचं बरीच चर्चा आहे आणि कौतुकही होतंय.
प्रसाद ओकचा मोठा लेक सार्थकने प्रसादला हे गिफ्ट दिलं आहे. त्यानंतर प्रसादची बायको मंजिरी हिने एक भावुक आणि अभिमानास्पद पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. प्रसादच्या लेकाने प्रसादला बीएमडब्लू कार गिफ्ट केली आहे. सार्थकच्या वाढदिवसाच्या दिवशी सार्थकने त्याच्या वडिलांसाठी ही आलिशन कार खरेदी केली.
मंजिरीची भावनिक पोस्ट
या सगळ्यावर मंजिरीने लिहिलेल्या पोस्टने साऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये मंजिरीने म्हटलं की, सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची, तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता ( अजूनही आहे ). तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला ( म्हणजे 3 सप्टेंबर 2002) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्यानी तुला ही सायकल सरप्राईज गिफ्ट म्हणून आणली होती. पण त्याला काळजी की तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर ? म्हणून कित्येक दिवस त्यानी तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही . (अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना)
पुढे मंजिरीने म्हटलं की, 'त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्या नंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद ( लहान मुलासारखा ) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे.. त्याचं कारण म्हणजे,आज 22 वर्षांनी ( 3 सप्टेंबर 2024 ) तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राईज गिफ्ट दिलीस… मी नको म्हणाले तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. ( त्या ऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल ). माझ्याकडे शब्द नाहियेत सार्थक… फक्त एवढच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंक चा पण…!!! खूप मोठ्ठा हो तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...'