Prajakta Mali : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रजक्ता माळी (Prajakta Mali) तिच्या अभिनयाने आणि नृत्यानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. प्राजक्तानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमधून प्राजक्तानं तिला मिळालेल्या पुरस्काराची माहिती दिली. पुरस्कार सोहळ्यातील फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.
पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिलं, 'आणि कालच्या शुभमुहूर्तावर “मुंबई- राजभवनात” जाण्याचा योग आला. काल महाराष्ट्राचे राज्यपाल - मा. श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 'कमला रायझिंग स्टार' पुरस्कार मिळाला..(कला क्षेत्रातील छान कामाबद्दल). आयोजन समिती आणि राज्यपाल यांचे मनापासून धन्यवाद. माझ्या काही आवडत्या व्यक्तींसह हा पुरस्कार मिळाला ह्याचा विशेष आनंद. प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन अशा पुरस्कारांमध्ये होतं असं मला वाटतं, त्यामुळे सर्व प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार. असच प्रेम राहू द्या.'
फोटोमध्ये प्राजक्ताची आई देखील दिसत आहे. प्राजक्तानं तिच्या आईचा आणि अभिनेता आकाश ठोसरचा फोटो शेअर केला आणि त्याबाबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'आई आणि भाऊ या सोहळ्यासाठी खास पुण्याहून आले होते, फोटो काढायचा राहिला, आईने आकाश बरोबर आवर्जून काढला.. चालायचं'
प्राजक्तासोबतच अमित त्रिवेदी, प्रतिक गांधी,शेफ रणवीर ब्रार, बिझनेस वूमन अनन्या बिर्ला, धर्मेश आणि आकाश ठोसर यांना देखील हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
हेही वाचा :
- Gangubai Kathiawadi : गंगूबाईचा नवा रेकॉर्ड; नेटफ्लिक्सवरदेखील आलिया भट्टचा बोलबाला
- Sanskrutik Kala Darpan Awards : सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेकडे नाट्यसृष्टीचे लक्ष; व्यावसायिक नाटकांची नामांकने जाहीर
- Trending : बालकलाकार Kailia Posey चा कार अपघातात मृत्यू; आईने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली माहिती