Prajakta Gaikwad Getting Married Soon: 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Marathi Actress Prajakta Gaikwad) सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्राजक्तानं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलेली. तेव्हापासून ती अवघ्या महाराष्ट्रात छत्रपतींची युवराज्ञी म्हणूनच ओळखली जाऊ लागली. ज्यावेळी विक्की कौशलचा 'छावा' सिनेमा रिलीज झाला, त्यावेळी त्यातल्या येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या रश्मिकाला पाहून सर्वांना प्राजक्ताचीच आठवण झाली, अक्षरशः दोघींची तुलना करुन प्राजक्ताच बरी, अशी प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिलेली. अशातच आजही लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या प्राजक्ता गायकवाडन आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेले. त्या फोटोंमध्ये पाहुण्यामंडळींच्या गराड्यात प्राजक्ता बसलेली दिसली. तसेच, प्राजक्तानं पारंपरिक साज केलेला. हे फोटो पाहून प्राजक्ताचं ठरलं, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झालेल्या. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षावही सुरू केला. पण, प्राजक्तानं मात्र यासंदर्भात कोणताही खुलासा केला नव्हता. अशातच आता प्राजक्तानं तिच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करुन प्राजक्तानं चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
प्राजक्तानं पोस्ट करत दिली आनंदाची बातमी
प्राजक्ता गायकवाडनं सोशल मीडियावर चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ता हात जोडून उभी आहे. तिनं पारंपरिक साज केला आहे. तर, तिच्या कपाळावर हळदीकुंकू लावलेलं आहे. तर, तिच्या अवतीभवती खूप नातेवाईत आहेत. याशिवाय प्राजक्ताच्या गळ्यात मोठा हार घातला आहे. प्राजक्ताच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहेच, पण त्याहीपेक्षा तिनं हे फोटो शेअर करताना दिलेलं कॅप्शन पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
प्राजक्तानं सोशल मीडियावर फोटो शेअर करताना कॅप्शन दिलंय की, "प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा…". त्यासोबतच तिनं एक हॅशटॅगही दिला आहे. #ठरलं... असं प्राजक्तानं पोस्टमध्ये लिहिलं आहे. प्राजक्तानं लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्राजक्तानं साताजन्माची गाठ कुणासोबत बांधायचं ठरवलं आहे, याबाबत मात्र अद्याप काही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे प्राजक्तानं जोडीदार म्हणून कुणाची निवड केलीय? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते अधीर झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :