Kiran Mane,Jitendra Awhad, Ram Kadam : अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढल्यामुळे सध्या ते सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. राजकिय भूमिका सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे किरण यांना या मालिकेतून काढण्यात आलं, असं म्हणटलं जात आहे. अनेक लोक किरण माने यांना पाठिंबा दर्शवत आहेत तर काही जण त्यांना ट्रोल करत आहेत. या प्रकरणाबद्दल आता राजकिय नेत्यांनी देखील त्यांची मतं व्यक्त केली आहे.
किरण माने यांना पाठिंबा दर्शवत जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'हा तर सांस्कृतिक दहशतवाद आहे.कोणतीही कला असो, तिच्यावर निर्बंध आले की , समाजाची निकोप सांस्कृतिक वाढ होत नाही. राज्यसत्ता,धर्म, धर्ममार्तंड,यांनी आपल्याला त्रासदायक असणाऱ्या अभिव्यकतीना चेपून टाकले, हे वेगळ्याने सांगायला नको.युरोप इंग्लंड पासून पार भारत देशात हे वागणे नवे नाही.मग तो विषाचा प्याला पिणारा सॉक्रेटिस असो अथवा आयुष्यभर अपमानाचे जिणे पेलणारे ज्ञानेश्वर असोत.सांस्कृतिक दडपशाही नवी नाही.तालिबानी विचारांना आपण हसतो पण त्यासारखे वागणे आपल्या देशात घडतेय याबद्दल सोयीस्कर मौन बाळगले जाते.आता यापुढे अजून एक प्रकार घडलाय.विद्यमान सरकारच्या धोरणावर नाराजी ,टीका केली म्हणून किरण माने या कलावंताला स्टार प्रवाह वाहिनीने काढून टाकले.कलावंताला कामावरून कमी करणे हे चित्रपट , किंवा नाट्यक्षेत्रात तसे नवे नाही पण किरण माने यांना ज्याप्रकारे काढले गेले ते अतिशय निषेधार्ह आहेत. कोणताही विरोधी विचार आम्ही ऐकून घेणार नाही, ही हुकूमशहा मनोवृत्ती यातून दिसते. स्टार वाहिनीवर किंवा त्या मालिकेच्या निर्मात्यावर, कोणता दबाव आणला गेला, की पुढील घटना वाईट होतील, या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलले, याची कल्पना नाही. ' किरण माने यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे..उद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गरजेचे आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
भाजपचे प्रवक्ते राम कदम यांचं महाविकास आघाडी वर टिकास्त्र
भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी महाविकास आघाडी वर टिका केली आहे. त्यांनी याबाबत सांगितले, 'हिंदू आतंकवाद या शब्दाला जन्म देऊन कोट्यावधी हिंदूंचा अपमान करणारे आता सांस्कृतिक दहशतवाद या शब्दाला जन्म देऊन या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्यांचा आपमान करत आहेत. कपिल शर्मा, शाहरुख खान, जावेद अख्तर, नसरुद्दीन शहा यांच्यापासून अनेकांनी केंद्र सरकारवर आणि नरेंद्र मोदींवर टीका केली पण कोणाचा चित्रपट गेला? वसुलीच्या खेळात स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी आणि अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारच्या खोट्या गोष्टीचा आधार घ्यावा लागत आहे.'
संबंधित बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीSamantha, पाहा लाईव्ह - ABP Majha