Celebrity Divorce : प्रेम, लग्न आणि घटस्फोट हे तसं मनोरंजन विश्वासाठी काही नवं नाही. बॉलिवूड कॅरिडॉरमध्ये रोज वेगवेगळ्या चर्चा सुरूच असतात. अनेक कलाकारंची अफेअर्स, नाती, लग्न सगळंच यात चर्चिलं जातं. सेलिब्रिटींची लग्न देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. मोठमोठे सोहळे, डोळे दिपवणारी रोषणाई, लग्नाच्या विविध पद्धती यामुळे ही लग्न सर्वसामान्य चाहत्यांच्या देखील लक्षात राहतात. अशीच काही बॉलिवूड अभिनेत्रींची लग्न वारेमाप खर्चांमुळे सर्वांच्याच लक्षात राहिली. मात्र, या नात्यात अभिनेत्री इतक्या दुखावल्या गेल्या की, वेगळं झाल्यानंतर त्यांनी पुन्हा लग्नाचा विचार केलाच नाही.


पूजा भट्ट : प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांची मोठी मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट्ट हिने मनीष माखिजासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. मनीषपासून घटस्फोट घेतल्यानंतर पूजाने दुसरे लग्न केले नाही.


संगीता बिजलानी : 80 आणि 90च्या दशकातील सुंदर अभिनेत्री संगीता बिजलानीने 1996मध्ये क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले. पण, लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर संगीताने पुन्हा लग्न केले नाही.


करिश्मा कपूर : अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये दिल्लीस्थित उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले. 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर संजयने पुन्हा लग्न केले, तर करिश्मा अजूनही अविवाहित आहे.


चित्रांगदा सिंह : या यादीत चित्रांगदा सिंहचे नाव देखील समाविष्ट आहे. तिने गोल्फर ज्योती रंधवासोबत लग्न केले होते. पण, 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अभिनेत्री चित्रांगदा सिंहने अजून दुसरे लग्न केलेले नाही.


मनीषा कोईराला : 90च्या दशकातील टॉप अभिनेत्री मनीषा कोईरालाने 2010मध्ये बिझनेसमन सम्राट दहलसोबत लग्न केले. पण, लग्नाच्या 2 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अविवाहित राहणेच मनीषाला योग्य वाटले.


कोंकणा सेन शर्मा : कोंकणा सेन शर्माने 2010मध्ये अभिनेता रणवीर शौरीसोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नाच्या 5 वर्षानंतर दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. रणवीरपासून घटस्फोट घेतल्यानंतर कोंकणाने दुसरे लग्न केले नाही.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha