मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गोवा सतत चर्चेत येतं आहे. आधी पूनम पांडेने व्हिडिओ चित्रित केल्याबद्दल तिला अटक करण्यात आली. त्यानंतर चर्चेत आला तो मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण. आपल्या वाढदिनी मिलिंदने गोव्याच्या एका खासगी किनाऱ्यावर न्यूड धाव घेतली. तसा फोटो त्याने सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर मात्र चर्चेला उधाण आलं. त्याने तसा फोटो टाकायला हवा की नको यावर अनेक तर्क वितर्क झाले. आणि अखेर गोवा पोलिसांनी मिलिंदबाबतची तक्रार दाखल केली.
एकिकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलेला भारतातला स्टार सुपरमॉडेल म्हणून मिलिंदकडे पाहिलं जातं. असं असताना त्याने केलेल्या फोटोशूटवरुन उठलेल्या वादात आता त्याच्यासारखीच बोल्ड अभिनेत्री पूजा बेदीने उडी घेतली आहे. पूजाने थेट मिलिंद सोमणचं समर्थन केलं आहे. पूजा म्हणते, 'मिलिंदने केलेल्या फोटोशूटमध्ये आक्षेपार्ह काय काय आहे तेच मला कळत नाही. जो फोटो आहे त्यात काहीच आक्षेपार्ह नाही. त्यांना मिलिंदचा फोटो असभ्य वाटतो त्या मंडळीने मिलिंदने जे दाखवलेलं नाही ते पाहण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे त्यांना तो फोटो अश्लील वाटतो. असं असेल तर मग नागा बाबांचीही तक्रार करायला हवी. तेही तितकेच दोषी आहेत. केवळ अंगाला राख फासली म्हणून काही होत नसतं. '
पूजाच्या या वक्तव्यावर अद्याप कुणाची टीका वा टीप्पणी आलेली नाही. पण तिने असं विधान करून नवा वाद आपल्यावर ओढवून घेतला आहे. मिलिंद सोमणने आपल्या 55व्या वाढदिनी गोव्यातल्या एका बीचवर न्यूड धाव घेतली होती. त्याचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेची राळ उठली होती. मिलिंद सोमण हा उत्तम मॉडेल म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. गेल्या जवळपास 33 वर्षांपासून तो मॉडेलिंग करतो आहे. इतकंच नव्हे तर तो सातत्याने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर आपल्या फिटनेसचे नमुने टाकत असतो. त्याच्य या व्हिडिओमुळे केवळ तोच नव्हेत तर संपूर्ण सोमण फॅमिली लोकांना परिचित झाली आहे. मिलिंदने 55 व्या वाढदिनी घेतलेल्या या धावेने मात्र एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे.
संबंधित बातम्या :