मॉडेल अभिनेता आणि फिटनेस प्रणेता मिलिंद सोमण त्यांच्या स्वतःच्या एका फोटोमुळे अडचणीत आले आहेत. मिलिंद सोमण यांनी स्वतःच्या वाढदिवशी न्यूड धावातानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मिलिंद सोमण यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 294 आणि कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अभिनेता मिलिंद सोमण यांच्याविरूद्ध आयपीसी कलम 294 (अश्लील कृती आणि गाणी) आणि कलम 67 (इलेक्ट्रॉनिक स्वरुपात अश्लील सामग्री प्रकाशित करण्यासंदर्भात दंड), अंतर्गत मिलिंद सोमण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





काय आहे प्रकरण?

मिलिंद सोमण यांनी आपल्या 55व्या वाढदिवसानिमित्त एक फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. त्यात मिलिंदने समुद्र किनाऱ्यावरून एक धाव घेतली आहे. एरवी ही धाव कुणीही घेतली असती तर फार फरक पडला नसता, पण मिलिंद यांनी ही धाव नागवी घेतली आहे. ही धाव घेताना मिलिंद यांच्या अंगावर एकही कपडा नाहीय. याला न्यूड रन असंही म्हटलं जातं. मिलिंद यांच्या पत्नीने त्याचा हा फोटो काढला असून तिनेही आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मिलिंद नेहमीच मनस्वी जगले आहेत. ऐन तारूण्यात मिलिंद यांनी अनेकदा अशा बोल्ड स्टेप्स घेतल्या आहेत. त्यावेळी मधू सप्रेसोबत त्यांनी केलेलं सापासोबतचं फोटोशूटही बरंच वादग्रस्त ठरलं होतं. आता जवळपास 30 वर्षानंतर पुन्हा एकदा मिलिंदने असं फोटोशूट केलं आहे. हा फोटो ट्विट करताना मिलिंद यांनी हॅप्पी बर्थ डे टू मी असं लिहिलं आहे. तर 55 एंड रनिंग असंही लिहिलं आहे. सोमण यांच्या अशा फोटोशूटमुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. मिलिंद यांनी बुधवारी सकाळी हा फोटो सोशल मीडियावर टाकला.