Police Complaint Against Violate Dharmendra Privacy: बॉलिवूडचे (Bollywood) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सध्या नाजूक असून त्यांच्यावर जुहू (Juhu) येथील त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू आहेत. रुग्णालयात बारा दिवस उपचार घेतल्यानंतर धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरीच उपचार करण्यात येणार आहेत. काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत.  पण, त्यांच्या प्रकृतीबाबत काही अफवाही पसरवण्यात आलेल्या. आता याप्रकरणी पॅपाराझी आणि माध्यमांच्या अमानुष वर्तनाचा तीव्र निषेध केला. 

Continues below advertisement

अभिनेते धर्मेंद्र यांच्या आजारपणादरम्यान पॅपाराझी आणि माध्यमांनी केलेल्या अमानुष वर्तनाचा इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFATDA)नं तीव्र निषेध केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अशोक पंडित यांनी पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे आणि अशा व्यक्तींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

"काही समाजकंटकांनी धर्मेंद्रजी यांच्या घरात प्रवेश केला, अन्..."

 सोशल मीडियावर तक्रारीची प्रत देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिलंय की, "भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आदरणीय दिग्गजांपैकी एक पद्मभूषण धर्मेंद्रजी यांच्या आजाराचं अलिकडेच कव्हरेज करताना सभ्यता आणि नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या काही अप्रमाणित पॅपाराझी आणि ऑनलाईन मीडिया ऑपरेटर्सविरुद्ध मी औपचारिक तक्रार दाखल करू इच्छितो. काही समाजकंटकांनी धर्मेंद्रजी यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या गोपनीयतेचं उल्लंघन केलं. कुटुंबातील सदस्यांचे फोटो आणि व्हिडीओ परवानगीशिवाय काढले गेले आणि खळबळ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केले गेले..."

Continues below advertisement

IFATDN नं याला पूर्णपणे अमानवीय, अनैतिक आणि बेकायदेशीर म्हटलंय. असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित म्हणाले की, "आपल्या सिनेसृष्टीचे दिग्गज कोणतीही वस्तू नाहीत; ते सुद्धा माणूस, एक व्यक्ती आहेत. आजारपण आणि वैयक्तिक संकटाच्या काळातही त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे. हे वर्तन केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचं नाही तर भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत हमी दिलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचंही उल्लंघन करतं. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार, हा एक फौजदारी गुन्हा आहे..."

"दिग्गजही माणूस आहेत, खाजगीपणाचा आदर करणं अत्यंत महत्त्वाचं..."

पत्रात त्यांनी पुढे म्हटलंय की, "IFATDA स्पष्ट करतं की, अशा कृती केवळ एका व्यक्तीलाच नव्हे तर, संपूर्ण चित्रपट उद्योगाला हानी पोहोचवतात आणि माध्यमांची विश्वासार्हता कमी करतात. असोसिएशन पोलिसांना गुन्हेगारांची त्वरित ओळख पटवून देण्याचं, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचं आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचं आवाहन करतं. तक्रारीत विशेषतः असं म्हटलंय की, चित्रपटातील व्यक्तिरेखा, ते कितीही दिग्गज असले तरी, त्यांना माणसांसारखं वागवलं पाहिजे. त्यांच्या खाजगीपणाचा आदर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, विशेषतः आजारपणाच्या किंवा दुःखाच्या वेळी..." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dharmendra Health Updates: 'त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी...', प्रकृती नाजूक असूनही धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज का देण्यात आला? 'ही-मॅन'च्या डॉक्टरांनी सांगितलं मोठं कारण