Dharmendra Health Updates: तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवणारे धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. तब्बल 12 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज (Dharmendra Discharged From Breach Candy Hospital) देण्यात आला. तेव्हापासूनच चाहत्यांच्या चिंतेत भर पडल्याचं पाहायला मिळालं. आपला लाडका अभिनेता कसा आहे? त्याची प्रकृती कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते अधीर झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, जर धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक (Dharmendra Condition Is Critical.) आहे, तर मग त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कसा देण्यात आला? असा प्रश्नही काही चाहत्यांनी उपस्थित केलेला. अशातच आता धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्यामागचं कारणं स्पष्ट केलंय.
धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार आता घरीच केले जातील, असं जाहीर केलेलं. ही बातमी ऐकून अनेकांना चिंता वाटली की, त्यांची प्रकृती गंभीर असतानाही त्यांना अचानक रुग्णालयातून का डिस्चार्ज देण्यात आला? अनेकांनी देओल कुटुंबीयांनाही प्रश्न विचारलेले. पण आता, धर्मेंद्र यांचे डॉ. प्रतित समदानी यांनी यावर भाष्य केलं आहे.
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून का डिस्चार्ज देण्यात आला?
धर्मेंद्र यांना सुमारे एक आठवड्यापूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांनी हेमा मालिनी यांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अभिनेत्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची बातमी समोर आली आणि एका दिवसानंतर त्यांच्या मृत्यूचं वृत्त समोर आलं. त्यानंतर, ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी त्यांच्या मृत्यूच्या सर्व अफवा फेटाळून लावणाऱ्या पोस्ट पोस्ट केल्या. अखेर 12 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला.
'त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी...', डॉक्टरांनी सांगितलं डिस्चार्ज देण्याचं मोठं कारण
आता, धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी विकी लालवानी यांच्याशी बोलून त्यांना डिस्चार्ज का देण्यात आला? याचं कारण स्पष्ट केलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, "धर्मेंद्र यांची दोन्ही मुलं सनी देओल, बॉबी देओल आणि त्यांच्या पत्नी प्रकाश कौर यांची इच्छा होती की, धर्मेंद्र घरी परत यावेत आणि त्यांच्यासोबत वेळ घालवावा. त्यामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. प्रतित समदानी म्हणाले की, "स्पष्टपणे, काही कारणांमुळे दोन्ही भाऊ आणि त्यांची आई प्रकाश कौर यांची इच्छा होती की, धर्मेंद्र यांनी त्यांच्या घरी परत यावं आणि तिथे त्यांच्यासोबत राहावं, जिथे त्यांनी आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ घालवला आहे. त्यांचा विश्वास आहे की, त्यांच्यासोबत राहून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल..."
डॉक्टरांनी पुढे बोलताना सांगितलं की, "या संकटाच्या काळात आम्ही देओल कुटुंबासोबत आहोत आणि धर्मेंद्रजी यांचं आरोग्य लवकर ठीक व्हावं यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतोय... सनी, बॉबी आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या वडिलांच्या उपचारासाठी सर्व आवश्यक व्यवस्था आणि खबरदारी घेत होते. तसेच, ते घरीसुद्धा अशीच व्यवस्था करणार आहेत. कुटुंबानं निर्णय घेतला की, धर्मेंद्र यांचे उपचार डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच केले जातील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :