पुणे : बारामतीकरांचं जसं शरद पवार (Sharad Pawar) साहेबांवर प्रेम आहे, तसंच माझं ही आहे. असं म्हणत दस्तुरखुद्द अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या कार्यकर्त्यांना घड्याळाच्या हाताने तुतारी फुंकण्याचे जणू आदेशच दिले. हे पाहून बारामती खालोखाल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरु झाली. पिंपरी चिंचवडमध्ये तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवारांकडे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आधीचं प्रस्ताव पाठवलाय. पण यावर शिक्कामोर्तब होण्याआधीचं पिंपरी चिंचवड मविआने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक घेतली अन् काहीही झालं तरी आपण अजित पवारांसोबत आघाडी करायची नाही, असं ठाकरे सेना आणि काँग्रेसने शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्याकडून जणू बजावूनचं घेतलंय.
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही हा प्रयोग मुळीच करणार नाही
कोल्हापुरातचं काय तर राज्यात कुठं ही पवार काका-पुतणे एकत्र आले तरी पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही हा प्रयोग मुळीच करणार नाही. हवं तर हे शरद पवार गटाला आमच्यादेखत विचारा, असं ठणकावत ठाकरे सेना आणि काँग्रेसने पवार काका-पुतण्यांच्या आघाडीत बिघाडी करण्याचं स्पष्ट संकेत दिलेत. मात्र विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसची आघाडी होऊ शकते, हा इतिहास पाहता उद्या काहीही होऊ शकतं. असं म्हणत शरद पवार राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा आग्रह काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडे लावून धरलाय. पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या हालचालींनी वेग धरल्यानंतर, मविआच्या बैठकीत याचे काय पडसाद उमटले हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.
Rohit Pawar : ...तर ह्यापेक्षा वेगळा आनंद काय होणार?'
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता आहे. NCP (SP) आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) दिलेल्या संकेतानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटानेही एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे की, 'एका घरामध्ये जर भिंत पडत असेल आणि कुटुंब एकत्र येत असेल तर ह्यापेक्षा वेगळा आनंद काय होणार?' भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही गट एक पाऊल मागे घेण्यास तयार असल्याचे यातून सूचित होते. जागावाटपाचा अंतिम निर्णय अजित पवार घेतील, पण जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
आणखी वाचा