Phule Movie : स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतीराव फुले (Jyotirao Phule) यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त आज (11 एप्रिल) 'फुले' (Phule) या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं कथानक महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये असे दिसत आहे की चित्रपटामध्ये अभिनेता प्रतिक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha) ही सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे.
फुले हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन हे करणार आहेत. डॉ. राज किशोर खवरे, प्रणय चोक्सी, सौरभ वर्मा, उत्पल आचार्य, अनुया चौहान कोडेचा आणि रितेश कोडेचा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रतिकनं नुकतच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
स्कॅम-1992 या वेब सीरिजमधील अभिनयामुळे प्रतिक गांधीला विशेष लोकप्रियता मिळाली. आता महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत प्रतिकला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
हेही वाचा :
- Mahatma Phule : उद्योजक ते सामाजिक क्रांतीतील अग्रणी ; महात्मा फुले यांच्या या 10 गोष्टी जाणून घ्या
- Alia Bhatt,Ranbir Kapoor : रणबीरची होणारी 'दुल्हनिया' आलियाकडे भारताचं नागरिकत्व नाही; मुंबईत जन्म पण...
- Dasvi Twitter Review : अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ला प्रेक्षकांनी केलं ‘पास’! सोशल मीडियावरही चित्रपटाची हवा!