Katrina Kaif : हॉंगकॉंग ते लंडन कतरिना कैफबद्दल हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!
कतरिना कैफनं छावा फेम अभिनेता विक्की कौशलसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.
कतरिना
1/9
कतरिना कैफ ही फक्त सुंदर अभिनेत्री नसून मेहनती, बहुभाषिक आणि खूपच शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व असलेली कलाकार आहे.
2/9
बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.
3/9
कतरिना कैफचा जन्म १६ जुलै १९८३ रोजी हॉंगकॉंगमध्ये झाला.
4/9
तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे मुस्लिम असून व्यवसायाने ब्रिटिश नागरिक आहेत, तर तिची आई सुझान टर्कॉट ही ब्रिटिश वंशाची समाजसेविका आहे.
5/9
कतरिना आठ भावंडांमध्ये एक आहे ज्यात ती सहाव्या क्रमांकावर आहे.
6/9
तिच्या आईवडिलांमध्ये लवकरच घटस्फोट झाला, आणि त्यानंतर तिच्या भावंडांची संपूर्ण जबाबदारी आईवर आली.
7/9
कतरिनाचं बालपण अत्यंत बहुदेशीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असं होतं
8/9
तिच्या आईच्या समाजसेवेच्या कामामुळे त्यांना सतत देशांमध्ये स्थलांतर करावं लागे. त्यामुळे तिला चीन, जपान, फ्रान्स, स्वित्झर्लंड, पोलंड, बेल्जियम, हवाई, आणि शेवटी लंडन या विविध देशांमध्ये राहतं आलं.
9/9
बालपणापासूनच तिला डान्स, फॅशन, आणि अभिनय यामध्ये रस होता. त्यामुळे लंडनमध्ये स्थायिक झाल्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केलं आणि तेथून तिच्या करिअरची खरी सुरुवात झाली.
Published at : 16 Jul 2025 01:04 PM (IST)