Jalna Marathi News : जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये एक संतापजनक प्रकार समोर आलाय. एका गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्ट दरम्यान लावण्यात येणाऱ्या जेली ऐवजी फिनाईल लावल्याने सदर महिलेच्या पोटच भाजून निघालंय. तालुक्यातील खापरखेडा वाडी गावातील एक गरोदर मातेला ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. सोनोग्राफी सेंटरमध्ये महिलेच्या तपासणी दरम्यान डॉपलर टेस्टवेळी संबंधित डॉक्टरांना जेली म्हणून चक्क या महिलेच्या पोटाला फिनाइल लावलं. त्यामुळे या महिलेच्या पोटावरील स्किन अक्षरशः भाजून निघाली आहे. रुग्णालयातील या प्रकारानंतर सर्वांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान सदर प्रकरणात संबंधित डॉक्टर किंवा नरसी चौकशी केली जाईल अशी माहिती जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील काय काय म्हणाले?
डॉ राजेंद्र पाटील म्हणाले, मी माहिती घेतल्याप्रमाणे वैद्यकीय अधिक्षकाकडून शिला संदीप भालेराव या महिला तिसऱ्या खेपेच्या गरोदर होत्या. त्यांची प्रसुती सकाळी साडेसहाच्या दरम्यान झाली. बाळाचे ठोके ऐकण्यासाठी डोपलर लावलं जातं. त्यावेळी तेथील सिस्टरच्या हातातून चुकून जेली लावण्याऐवजी चुकून फिनायल सारखं किंवा आयोडिनसारखं केमिकल लावण्यात आलं. त्यामुळे सुपरफिशियल बर्न झालेलं आहे. त्यावर आता औषधउपचार करण्यास सांगण्यात आलं आहे. हे चुकून घडलंय की, मुद्दामहून करण्यात आलंय? याबाबतचा रिपोर्ट वैद्यकीय अधिक्षकांना देण्यास सांगण्यात आलंय. सध्या बाळ आणि आई सुस्थितीत आहे. घाबरण्याचं कारण नाही. आम्ही रुग्णालयात अॅसिड वापरत नाही, जे वापरलं गेलंय ते फिनायल असावं. वैद्यकीय अधिक्षकांचं मत आहे. त्यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. सध्या बाळ आणि आई दोघांची प्रकृती चांगली आहे.
पेशंटचे नातेवाईक काय काय म्हणाले?
पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितलं की, आम्ही सकाळी सहा वाजता महिलेला इथं आणलं. त्यानंतर साडेसहाला रुग्णालयात आणलं. त्यानंतर त्यांनी बाळाचे ठोके पाहायचे आहेत, असं सांगितलं. मात्र, त्यावेळी त्यांनी औषध वापरायचं सोडून दुसरं अॅसिड टाकलं, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. आता संबंधित डॉक्टर आणि सिस्टरवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
काहीतरी मर्यादा ठेवा, पुण्यात नामांतरावरुन लागलेल्या बॅनवरुन संताप; मेधा कुलकर्णींना रडू कोसळले